ग्वाल्हेरमध्ये एका महिलेने आपल्या सासरच्या मंडळींविरोधात खोटी पोलीस तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी अधिक तपास केला. यावेळी आरोपीने रडत रडत आपण निर्दोष असल्याचा पुरावा दिला. यानंतर सुनेने सासऱ्यांच्या पाया पडून त्यांची माफी मागितली. तसेच भविष्यात भांडण करणार नाही अशी शपथ घेतली.
हे प्रकरण ग्रामीण भागातील हस्तिनापूर पोलीस ठाण्याशी संबंधित आहे. येथे सीता बघेल नावाची एक महिला पंजाबमधून तक्रार करण्यासाठी आली होती. पतीच्या मृत्यूनंतर सासरे हरिराम बघेल आणि सासूने आपली फसवणूक केल्याचे तिने सांगितले. पतीच्या वाट्याची जमीन विकून तिला शिवीगाळ करून घरातून हाकलून दिल्याचं म्हटलं आहे.
हे आरोप करत महिलेने सासू, सासरे आणि दिराविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची विनंती केली. हस्तिनापूर पोलीस स्टेशन प्रभारी राजकुमार राजावत यांना सत्य समजलं. यानंतर एसडीओपी बेहट संतोष कुमार पटेल यांनी समोरासमोर बसून महिला आणि सासरा, दीर यांची यांची पंचायत ठेवली.
यानंतर दोन्ही पक्षांमधील शंका दूर झाल्या. सासरच्यांनी विकलेल्या जमिनीच्या बदल्यात मिळालेले पैसे दाखवले. पूर्ण हिशोबही दिला. यानंतर सुनेने सासऱ्यांना नमस्कार करून माफी मागितली. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.