शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI Repo Rate : ईएमआय कमी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार, यावेळीही रेपो दर 'जैसे थे'
2
Ajit Pawar On Sharad Pawar : "मी जी राजकीय भूमिका घेतली ती साहेबांना सांगूनच, आधी हो म्हणाले नंतर..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
3
Tejashwi Yadav : "भाजपा आरजेडीला घाबरते, आमचं चारित्र्य खराब करायचंय; ते सत्तेत येऊ शकत नाहीत म्हणून..."
4
Haryana Assembly Election Result 2024 : राम रहिम याचा भाजपासह काँग्रेसलाही फायदा; हरयाणा निकालातील आकडेवारीतून माहिती
5
'भाऊ' Bigg Boss च्या पुढच्या पर्वात दिसणार का? रितेश देशमुख म्हणाला, 'हा निर्णय तर...'
6
धक्कादायक! हिंदू नाव वापरुन २२ पाकिस्तानी राहायचे, बनावट कागदपत्रे बनवून देणाराही अटकेत
7
दबा धरुन बसलेल्या बिबट्याचा महिलेवर हल्ला; घरापासून १०० फूट ओढत नेलं अन्...
8
PhysicsWallahचा IPO येणार! कंपनीनं सुरू केलं काम; ४ इन्व्हेस्टमेंट बँकर्सचीही केली नियुक्ती
9
"हा देखावा कशासाठी?"; सामूहिक अत्याचाराच्या जागेची पाहणी करणाऱ्या सुप्रिया सुळेंवर टीकास्त्र
10
बहुमत असले तरी अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स भाजपसोबत जाणार? जम्मू काश्मीरमध्ये लावले जातायत अंदाज
11
ऑस्ट्रेलियानं लावली न्यूझीलंडची वाट; आता सेमीसाठी टीम इंडिया कशी ठरेल पात्र?
12
मंदिरातून परतणाऱ्या मुलीची काढली छेड; भावाने विरोध करताच बेदम मारहाण, झाला मृत्यू
13
कोलकाता निर्भया प्रकरण : आरजी कर रुग्णालयातील ५० वरिष्ठ डॉक्टरांनी दिला राजीनामा
14
Savitri Jindal Haryana Election Networth : हिसारमधून निवडणूक जिंकणाऱ्या सावित्री जिंदाल यांची नेटवर्थ माहितीये? भल्याभल्यांना टाकलंय मागे
15
Breaking: खळबळजनक! दहशतवाद्यांकडून दोन जवानांचे अपहरण; पैकी एक तावडीतून सुटला
16
साईबाबा संस्थानला गुप्त दानावर कर द्यावा लागणार? हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला
17
राम रहीमला ६ वेळा पॅरोल देणाऱ्या माजी पोलीस अधिकाऱ्याचा विजय; भाजपमध्ये केला होता प्रवेश
18
"जिंकलेल्या डावाचे पराभवात रूपांतर करायचे काँग्रेसकडून शिकावे"; हरयाणा निकालावरुन ठाकरे गटाचा निशाणा
19
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
20
आजचे राशीभविष्य ९ ऑक्टोबर २०२४; प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल

Gyanvapi case: ज्ञानवापी प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, मुस्लिम पक्षाला धक्का 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 4:50 PM

Gyanvapi case: वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीचा पुरातत्त्व विभागा (एएसआय) कडून सर्व्हे करण्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीचा पुरातत्त्व विभागा (एएसआय) कडून सर्व्हे करण्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. हा सर्व्हे सुरू ठेवावा, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. या सर्व्हेमुळे मुस्लिम पक्षाला भरपाई होऊ शकणार नाही, असं कुठलंही नुकसान होणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने सर्व्हेला परवानगी देताना  स्पष्ट केले.

याबाबतचा निर्णय देताना सुप्रीम कोर्टाने आम्ही या सर्व्हेमधील अहवाल हा सिलबंद पाकिटामध्ये ठेवण्याचे आदेश देऊ, असेही सांगितले. तर ज्ञानवापीमधील सर्व्हेला विरोध करणाऱ्या मुस्लिम पक्षाच्या वकिलांनी या सर्वांमधून प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्टचं उल्लंघन होईल, असा दावा केला. त्यावर या कायद्याचा हवाला देऊ नका, असे सुप्रीम कोर्टाने वकिलांना सांगितले. 

दरम्यान, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुनावणीदरम्यान सांगितले की, या सर्व्हेमध्ये जीपीआर तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. या पद्धतीने करण्यात येणाऱ्या सर्व्हेमधून इमारतीला कुठलंही नुकसान होणार नाही. तर मुस्लिम पक्षाची बाजू मांडण्यासाठी उपस्थित असलेल्या वकिलांनी सांगितले की, असं करणं हे ५०० वर्षे जुन्या इतिहासाला उगाळण्यासारखं होईल. हे कृत्य जुन्या जखमेवरची खपली काढण्याचा प्रकार असेल. त्यामुळे प्लेसेस ऑफ वर्शिप अॅक्टमध्ये करण्यात आलेल्या व्यवस्थेतील भावनेचा सन्मान केला गेला पाहिजे. याबाबत मुस्लिम पक्षाकडून अनेक जुन्या आदेशांचाही हवाला दिला गेला.  

टॅग्स :Gyanvapi Mosqueज्ञानवापी मशीदSupreme Courtसर्वोच्च न्यायालयVaranasiवाराणसी