Gyanvapi Masjid Case:समाजवादी पार्टी (SP)चे खासदार शफीकुर्रहमान बर्क (Shafiqur Rahman Barq) यांनी वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीबाबत बोलताना एक वादग्रस्त विधान केलं आहे. वर्क यांनी रविवार मीडियाशी बोलताना दावा केला की, वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत कसलेही 'शिवलिंग' नाही. त्यांनी आरोप की, ही परिस्थिती 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी तयार केली जातीये.
मशीद कोणी घेऊ शकणार नाहीयावेळी शफीकुर्रहमान यांनी मशिदीबाबत बोलताना एक मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले की, 'कुणीच आमची मशीद हिसकाऊन घेऊ शकणार नाही. मशिदीसाठी जीव द्यावा लागला, तरीदेखील आम्ही देऊ. आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत ज्ञानवापी सोडणार नाहीत. मुस्लिमांकडून ज्ञानवापी कोणी घेऊ शकत नाही.'
अयोध्येबाबत म्हणाले...बर्क यांनी यावेळी अयोध्येतील राम मंदिरावरही भाष्य केले. ते म्हणाले, 'अयोध्येत राम मंदिराचे निर्माण होत आहे, पण तिथे एक मशीद होते. मी आजही म्हणतो की, तिथे मशीद आहे. फक्त शक्तीच्या जोरावर मशिदीच्या जागी मंदिर उभारले जात आहे. मुस्लिमांवर हल्ले केले जात आहेत, मशिदी पाडल्या जात आहेत. सरकारने कायद्याचे पाल करावे. आजची परिस्थिती आगामी लोकसभा निवडणुकीसाठी तयार केली जात आहे. तुम्ही इतिहास पाहिला तर, तुम्हाला कळेल की, ज्ञानवापीमध्ये कुठलेच शिवलिंग नाही. हे सर्व खोटं आहे.'