कोची : मार्क झुकेरबर्गने आॅनलाईन सोशल नेटवर्किंगमध्ये क्रांती घडवली असेल. त्याने फेसबुकच्या साहाय्याने करोडो रुपये कमावले असतील; पण भारतातल्या एका तरुणाने अशी एक गोष्ट केली की, ज्यामुळे झुकेरबर्गला त्याच्याशी व्यवहार करावा लागला. तामिळनाडूच्या अमल अगस्टाईन या तरुणाने एक डोमेन रजिस्टर केले होते जे झुकेरबर्गने विकत घेतले आहे. झुकेरबर्गने आपल्या मुलीचे नाव मॅक्सिम चॅन झुकेरबर्ग असे ठेवले होते. त्यानंतर अगस्टाईनने maxchanzuckerberg.org नावाने डोमेन रजिस्टर केले. फेसबुक टीमने अमल अगस्टाईनची माहिती काढत त्याच्याशी संपर्क साधला आणि हे डोमेन ७०० डॉलरला खरेदी केले. आपल्याशी फेसबुक व्यवहार करीत आहे याची माहिती नसणाऱ्या अमल अगस्टाईनने आनंद व्यक्त केला आहे. (वृत्तसंस्था)