दिल्ली - भारतीय जनता पार्टीची अधिकृत वेबसाईट (http://www.bjp.org/) हॅक झाल्याची माहिती आहे. ही बेबसाईट उघडताच स्क्रीनवर अश्लिल भाषेचा वापर केल्याचे समोर आले. आत्तापर्यंत भाजपकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.
सकाळी 11 वाजून 30 मिनिटांनी ही वेबसाईट हॅक करण्यात आली. वेबसाईट उघडताच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जर्मनीचे चांसलर एंजेला मर्केल यांचा व्हिडिओ समोर येतो. या व्हिडीओसोबत अश्लिल शब्दांचा वापर केला गेला असल्याचे निदर्शनास आले. मात्र काही मिनिटांतच भाजपा अधिकृतची ही वेबसाईट बंद करण्यात आली आहे. वेबसाईट उघडण्याचा प्रयत्न करताच स्क्रीन एरर 522 असा संदेश दाखवण्यात येत आहे.
भाजपची वेबसाईट हॅक झाल्यानंतर काँग्रेसच्या सोशल मिडिया प्रभारी दिव्या स्पंदना यांनी नेटीझन्सना टिविट् करून भाजपची वेबसाईट बघण्याचे आवाहन केले.