बंगळुरू - एथिकल हॅकर्सनी ट्रायचे प्रमुख आर.एस. शर्मा यांच्या बँक खात्यांची माहिती आपल्याकडे असल्याचा दावा केला आहे. एवढंच नाही तर या हॅकर्सनी शर्मा यांना आधारशी संलग्न असलेल्या पेमेंट सर्व्हिसमधून शर्मा यांच्या खात्याच एक रुपया जमा केला आहे. हॅकर्सनी ट्विटरवरून हा दावा केला आहे. तसेच पुरावा म्हणून शर्मा यांचा एक रुपया पाठवल्याचे स्क्रीनश़ॉट प्रसिद्ध केले आहेत. एवढंच नाही तर शर्मा यांच्या खात्यात पैसे जमा केल्याचा ट्रान्झॅक्शन आयडीसुद्धा त्यांनी पोस्ट केला आहे.
दरम्यान, रविवारी एथिकल हॅकर्स इलियन एल्डरसन, पुष्पेंद्र सिंह, कनिष्क सजनानी, अनिवर अरविंद आणि करण सैनी यांनी आतापर्यंत शर्मा यांच्याबाबतची 14 प्रकारची माहिती लीक झाली आहे. यामध्ये ट्रायप्रमुखांच्या घरचा पत्ता, मोबाइल नंबर, जन्मतारीख, पॅनकार्ड क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक आदींचा समावेश आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाचे (ट्राय) अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी आधार कार्डसंबंधी ट्विटरवर एक आव्हान दिले. आधार क्रमांक सार्वजनिक केल्याने गोपनीयतेला धक्का पोहोचत नाही, असा दावा शर्मा यांनी केला होता. शर्मा यांचे आव्हान एलियट एल्डर्सन नावाच्या युजरनं स्वीकारलं. केवळ स्वीकारलंच नाही तर पूर्णदेखील केले. फ्रान्समधील सुरक्षा संशोधक असल्याचा दावा यावेळी एलियट एल्डर्सन यानं करत शर्मा यांची गोपनीय माहिती सार्वजनिक केली. काही मिनिटांतच एलियट एल्डर्सननं शर्मा यांचा पत्ता, आधार कार्डसोबत जोडण्यात आलेला मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी, जन्मदिनांक आणि त्यांचे व्हॉट्सअॅपवरील फोटोदेखील सार्वजनिक केले. मात्र शर्मा यांच्याबाबतची माहिती शेअर करताना कोणत्या अडचणी निर्माण होऊ नयेत, यासाठी माहिती व फोटो ब्लर केले होते.