दहशतवाद्यांना मारायला गेला होता, की झाडं पाडायला? नवज्योत सिंह सिद्धूंकडून एअर स्ट्राइकवर सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 06:02 PM2019-03-04T18:02:56+5:302019-03-04T18:26:46+5:30

भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होता. मात्र आता या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवरून राजकारण सुरू झाले आहे.

Had to kill the terrorists, to hit the trees? Navjyot Singh Sidhu questions on air strike | दहशतवाद्यांना मारायला गेला होता, की झाडं पाडायला? नवज्योत सिंह सिद्धूंकडून एअर स्ट्राइकवर सवाल

दहशतवाद्यांना मारायला गेला होता, की झाडं पाडायला? नवज्योत सिंह सिद्धूंकडून एअर स्ट्राइकवर सवाल

ठळक मुद्दे भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होताआता या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवरून राजकारण सुरूदहशतवाद्यांना मारायला गेला होता की झाडं पाडायला, अशी विचारणा नवज्योत सिंह सिद्धू यांनी केली

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानमधील बालाकोट येथील जैश ए मोहम्मदचा तळ उद्ध्वस्त केला होता. मात्र आता या कारवाईत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांवरून राजकारण सुरू झाले आहे. या कारवाईत खरंच दहशतवादी मारले गेले आहेत का? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येऊ लागला आहे. आता काँग्रेसचे नेते आणि पंजाब सरकारमधील मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांनीही एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. केंद्रीय मंत्री एसएस अहलुवालिया यांनी केलेल्या वक्तव्याचा दाखला देत, दहशतवाद्यांना मारायला गेला होता की झाडं पाडायला, अशी विचारणा नवज्योत सिंह सिद्धू यांनी केली आहे. 

भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये 250 हून अधिक दहशतवादी मारले गेले, असा दावा भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. त्यानंतर यासंदर्भातील वादाला तोंड फुटले आहे. दरम्यान एअर स्ट्राइकचा उद्देश पाकिस्तानला इशारा देण्याचा होता, मारण्याचा नाही असे वक्तव्य केंद्रीय मंत्री एस. एस. अहलुवालिया यांनी केले होते. तो धागा पकडत सिद्धू म्हणाले की, दहशतवाद्यांना मारायचे नव्हते तर कारवाईचा हेतू काय होता. दहशतवाद्यांना मारायला नाही तर काय झाडं पाडायलया गेला होता काय? ही निवडणुकीसाठीची स्टंटबाजी आहे का?'' 

''300 दहशतवादी ठार झाले आहेत की नाही. सध्या सुरू असलेले लष्करावरील राजकारण बंद झाले पाहिजे.''असेही सिद्धू म्हणाले.  दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनीही एअर स्ट्राइकमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.  
 

Web Title: Had to kill the terrorists, to hit the trees? Navjyot Singh Sidhu questions on air strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.