शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

ISIS च्या संपर्कात होता हादियाचा पती, राष्ट्रीय तपास यंत्रणेची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2017 9:15 AM

अखिला अशोकन उर्फ हादियाचा पती शफीन जहान लग्नाच्या एक महिना आधी एका फेसबुक ग्रुप आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे.

ठळक मुद्देअखिला अशोकन उर्फ हादियाचा पती शफीन जहान लग्नाच्या एक महिना आधी इसिसच्या संपर्कात होता राष्ट्रीय तपास यंत्रणेचा दावाफेसबुक ग्रुप आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून होता संपर्कात

नवी दिल्ली - अखिला अशोकन उर्फ हादियाचा पती शफीन जहान लग्नाच्या एक महिना आधी एका फेसबुक ग्रुप आणि प्रसिद्ध मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून दहशतवादी संघटना इसिसच्या संपर्कात होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे.  या फेसबुक ग्रुपमध्ये पॉप्यूलर फ्रंट ऑफ इंडियाचा (पीएफआय) राजकीय पक्ष एसडीपीआयचे काही सदस्यही होते. यासोबत उमर अल-हिंदी प्रकरणात अटक करण्यात आलेले इसिसचे दहशतवादी मनसीद आणि साफवानदेखील या ग्रुपमध्ये होते अशी माहिती एनआयएने दिली आहे.

मनसीद आणि साफवान यांना गतवर्षी ऑक्टोबर महिन्यात उमर अल-हिंदी प्रकरणी एनआयएने अटक केली होती. त्यांच्यावर आरोप आहे की, इसिसपासून प्रभावित त्यांनी दक्षिण भारतातील उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांवर हल्ला करण्याचा कट आखला होता. 

एनआयएचा दावा आहे की, मनसीद आणि एसडीपीआयच्या त्याच्या साथीदारांनी (ज्यांच्यात शफीनचा मित्र मुनीर सामील आहे) हादियाचा संपर्क शफीनशी करुन दिला होता. याआधी दावा करण्यात आला होता की, हादिया आणि शफीनची भेट मॅट्रिमोनिअल वेबसाईट  waytonikah.com च्या माध्यमातून झाली होती. एनआयएच्या सुत्रांनुसार, मनसीद पीएफआयच्या माध्यमातून सैनबाच्या संपर्कात होता. सैनबालाच न्यायालयाने हादियाच्या लग्नावेळी गार्डियन म्हणून नेमलं होतं.

एनआयएच्या तपासात समोर आलं आहे की, मनसीद आणि साफवान शफीनच्या संपर्कात होते. शफीन कॉलेजच्या दिवसांपासूनच एसडीपीआयच्या विद्यार्थी संघटनेच्या जिल्हा समितीचा सदस्य आणि सक्रीय कार्यकर्ता होता. हे सर्व लोक सोशल मीडिया अॅप आणि फेसबुक ग्रुप 'थनल'च्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. 

अखिला अशोकन उर्फ हादियाने धर्मपरिवर्तन करत शफीन जहानशी निकाह केला होता. यानंतर हादियाच्या वडिलांनी केरळ उच्च न्यायालयात धाव घेत लग्न रद्द करण्याची मागणी केली होती. याचिकेच हादियाचं जबरदस्तीने धर्मपरिवर्तन करण्यात आलं असून, शफीनचे इसिसशी संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. केरळ उच्च न्यायालयाने कलम 226 अंतर्गत विवाह रद्द केला होता आणि हादियाला वडिलांकडे सोपवण्याचा निर्णय दिला होता. यानंतर शफीनने केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. उच्च न्यायालयाच्या निकालावरच सर्वोच्च न्यायालयाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तसेच वडील मुलीच्या व्यक्तिगत आयुष्यात ढवळाढवळ करू शकत नाहीत, असे म्हटले होते. 

सर्वोच्च न्यायालयाने निकाल देताना हादियाला तमिळनाडूत वैद्यकीय शिक्षणासाठी परत पाठविण्याच्या आदेश दिला. तिच्या वडिलांनी निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, ‘आमच्या कुटुंबात कोणाही दहशतवाद्याला स्थान नाही,’ असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :ISISइसिसNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाHinduहिंदूIslamइस्लामLove Jihadलव्ह जिहादSupreme Courtसर्वोच्च न्यायालय