शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

हाफिज सईदला ठरवले पाकिस्ताननेच दहशतवादी

By admin | Published: April 22, 2017 2:04 AM

मुंबईवर २00८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद हा दहशतवादी असल्याचे स्वत: पाकिस्ताननेच मान्य केले आहे.

नवी दिल्ली : मुंबईवर २00८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दावा या संघटनेचा प्रमुख हाफिज सईद हा दहशतवादी असल्याचे स्वत: पाकिस्ताननेच मान्य केले आहे. पाकिस्तानच्या गृह मंत्रालयाने लाहोर उच्च न्यायालयामध्ये यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. हाफिजचा दहशतवाद आणि दहशवादी कारवायांशी संबंध असल्याचे पाकच्या गृह मंत्रालयाने या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. हाफिज ३0 जानेवारीपासून लाहोर येथे नजरकैदेत आहे. हे अवैध असल्याची याचिका तो प्रमुख असलेल्या जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेने न्यायालयात केली आहे. त्यावर न्यायालयाने पाकिस्तान सरकारला भूमिका मांडायला सांगितले होते. त्यावर पाक सरकारने प्रतिज्ञापत्रात म्हटले की, हाफिजने अशांतता पसरवल्याचे पुरेस पुरावे उपलब्ध आहेत. एवढेच नव्हे, तर त्याच्याविरोधात दहशतवादविरोधी कायद्याअंतर्गतही कारवाई करण्यात आली आहे. मध्यंतरी पाकिस्तानने त्या देशातील अनेकांची सुरक्षा व्यवस्था कमी केली होती. त्यात हाफिजचाही समावेश होता. सुरक्षा कमी केल्यावर त्याला लगेचच नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला. सुरक्षित ठेवण्यासाठीच त्याला नजरकैदेत ठेवल्याची टीकाही अनेकांनी पाक सरकारवर केली होती. अमेरिकेने हाफिजचा मोस्ट वाँटेड दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला आहे. शिवाय त्याच्या अटकेसाठी मदत करणाऱ्या व्यक्तीला एक कोटी डॉलरचे बक्षीस देण्याचेही जाहीर केलेले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)अमेरिकेचा दबाव?सात मुस्लीमबहुल राष्ट्रांतील नागरिकांना अमेरिकेने प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला असून, पाकिस्तानी नागरिकांवरही अमेरिका असेच निर्बंध घालेल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने हाफिजला दहशतवादी घोषित करण्याचा निर्णय घेतला असावा, असे बोलले जाते.