हरीश गुप्ता नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या जोडगोळीने गुजरात आणि हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर, भाजपा व मित्रपक्षांकडे १९ राज्ये आली आहेत.हिमाचल प्रदेशात प्रेमकुमार धुमल पराभूत झाल्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा आ. जयराम ठाकूर यांची मुख्यमंत्रिपदी वर्णी लागू शकते. गुजरातेत पाटीदार नेते नितीन पटेल यांचा दावा असला, तरी विजय रूपाणी यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद कायम ठेवले जाऊ शकते.गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विजयामुळे मोदी सरकारला सुधारणा कार्यक्रम सुरू ठेवणे सुलभ होणार आहे. नोटाबंदी व जीएसटीमुळे आलेल्या अडथळ्यांची ते पर्वाकरणार नाहीत, असे दिसते. २०१४ पासून मोदी सरकार आपल्या आर्थिक कार्यक्रमावर ठाम असल्याचे चित्रदिसून आले. हा कामगिरी आणि विकासाचा विजय आहे. देश कामगिरी आणि विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करीत आहे, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.गुजरातची निवडणूक राहुल गांधी यांची नव्हे, तर मोदी यांची कसोटी पाहणारी होती. कर्नाटकची निवडणूक काँग्रेससाठी महत्त्वाची आहे. हे मोठे राज्य असून, तेथे काँग्रेसची सत्ता आहे. कर्नाटकात भाजपा जिंकल्यास काँग्रेसमुक्त भारताची कल्पना स्वप्न नसल्याचे सिद्ध होईल. मोदी-शहा यांचा धडाका पाहता, शत्रुघ्न सिन्हा, वरुण गांधी व अन्य मोदीविरोधकांना आता विचार करावा लागेलच, शिवाय विरोधी पक्षांनाही ‘महागठबंधना’च्या स्वप्नाबाबत जलदगतीने विचार करावा लागेल.गुजरात : भाजपाहिमाचल प्रदेश : भाजपाउत्तराखंड : भाजपाहरयाणा : भाजपाराजस्थान : भाजपामध्य प्रदेश : भाजपाछत्तीसगड : भाजपाझारखंड : भाजपाआसाम : भाजपाअरुणाचल : भाजपागोवा : भाजपाउत्तर प्रदेश : भाजपामणिपूर : भाजपामहाराष्ट्र : भाजपा+शिवसेनाजम्मू काश्मीर : पीडीपी+भाजपाबिहार : जनात दल + भाजपाकर्नाटक : काँग्रेसपुद्दुचेरी : काँग्रेसमिझोरम : काँग्रेसमेघालय : काँग्रेसपंजाब : काँग्रेसदिल्ली : आपप. बंगाल : तृणमूलओडिशा : बिजू जनता दलतेलंगणा : तेलंगण राष्ट्रीयआंध्र प्रदेश : तेलगू देसमतामिळनाडू : अण्णा द्रमुककेरळ : डावी आघाडीत्रिपुरा : मार्क्सवादीनागालँड : नागा पिपल्ससिक्किम : डेमॉक्रॅटिक फ्रंट
भाजपाकडे अर्धा भारत, कोणाकडे किती राज्ये ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 1:29 AM