शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

अर्ध्या शहराचा आज वीजपुरवठा बंद देखभाल व दुरुस्तीची कामे : महावितरण काढणार नागरिकांचा घाम

By admin | Published: June 19, 2015 2:21 AM

औरंगाबाद : महावितरणतर्फे शहरातील विभाग-१ आणि विभाग-२ मधील भागात १९ जून रोजी देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दिवसभर वीजपुरवठा बंद राहणार असल्यामुळे शहरवासीयांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

औरंगाबाद : महावितरणतर्फे शहरातील विभाग-१ आणि विभाग-२ मधील भागात १९ जून रोजी देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांतील वीजपुरवठा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. दिवसभर वीजपुरवठा बंद राहणार असल्यामुळे शहरवासीयांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. नारेगाव, टाऊन सेंटर, कॅनॉट, सिडको बसस्थानक, राज टॉवर, एबीसीडीई सेक्टर, ब्रिजवाडी, मसनतपूर, शहानगर, अयोध्यानगर, एन-७, एन-८ सिडको, म्हाडा, पवननगर, शिवनेरी कॉलनी, रोशनगेट, कटकटगेट, बाबर कॉलनी, पोलीस कॉलनी, बजरंग चौक, जिजामाता कॉलनी, गुलमोहर कॉलनी इ. भागांत देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. याशिवाय चितेगाव फिडरवरील भाग, नक्षत्रवाडी गाव, समतानगर, हिंदुस्तान लिव्हर, वेदांतनगर, बन्सीलालनगर, म्हाडा कॉलनी या भागांतील वीजपुरवठा सकाळी ११ ते २ यावेळेत बंद राहणार आहे. सिमेन्स फिडर, एम सेक्टर फिडरवरील ई-सेक्टर, एल सेक्टर, जी सेक्टर, एम सेक्टर भागांत सकाळी १०.३० ते १.३० तसेच बजाजनगर, डब्ल्यू सेक्टर, एक्स सेक्टर, सी सेक्टर वॉटर वर्क, एमआयडीसी वाळूज, बाबा पेट्रोलपंप, बन्सीलालनगर, गोविंदनगर, रेल्वेस्टेशन, बनेवाडी, क्रांतीनगर, पदमपुरा, छावणी, नंदनवन कॉलनी, गवळीपुरा, शांतीपुरा, भावसिंगपुरा, पटेल चौक, के सेक्टर या भागांत सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. राहुलनगर, गोलवाडी, एमआयडीसी रेल्वेस्टेशन, एकनाथनगर, कबीरनगर, मिलिंदनगर, नागसेननगर, ईटखेडा, सिल्क मिल कॉलनी, म्हाडा, शहानगर या भागांतील वीजपुरवठा सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.फांद्यांचा विळखा शहरातील विविध भागांत विद्युत वाहिन्या झाडांच्या फांद्यांमध्ये अडकल्याचे दिसून येत आहे. मान्सूनपूर्व तयारीमध्ये झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्याचे अपेक्षित आहे; परंतु अद्यापही अनेक भागांत विद्युत वाहिन्यांना झाडांच्या फांद्यांचा विळखा कायम आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महावितरणकडून देखभाल-दुरुस्तीचे काम होत आहे.