उसाचे क्षेत्र आले निम्म्यावर
By admin | Published: March 11, 2016 10:24 PM
जळगाव- एकेकाळी ऊस उत्पादनात आघाडीवर राहीलेल्या जिल्ह्यात अलीकडे उसाचे क्षेत्र घटले आहे. मागील हंगामांच्या तुलनेत हे क्षेत्र निम्यावर आले आहे. यातच जेथे कारखाना नाही त्या चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक २२६६ हेक्टरवर ऊस आहे.
जळगाव- एकेकाळी ऊस उत्पादनात आघाडीवर राहीलेल्या जिल्ह्यात अलीकडे उसाचे क्षेत्र घटले आहे. मागील हंगामांच्या तुलनेत हे क्षेत्र निम्यावर आले आहे. यातच जेथे कारखाना नाही त्या चाळीसगाव तालुक्यात सर्वाधिक २२६६ हेक्टरवर ऊस आहे. ऊस हे काही वर्षांपूर्वी महत्त्वाचे नगदी पीक म्हणून जिल्ह्यात घेतले जात होते. त्याचे सर्वसाधारण क्षेत्र १८ हजार हेक्टर होते. बेलगंगा, कासोदा, मधुकर चोपडा हे साखर कारखाने सुरू होते. आता फक्त मधुकर, मुक्ताई व चोपडा साखर कारखाना सुरू आहे. पैकी चोपडा कारखान्याची स्थिती जेमतेम आहे. भाव अस्थिरउसाला टनमागे १८५० पर्यंत भाव आहे. त्यातही पहिली उचल १५०० प्रति टन मिळते. त्यानंतर एक हप्ता २०० रुपयांचा व तिसरा आणि शेवटचा हप्ता १५० रुपयांचा असतो. हा पैसा मिळण्यास आठ ते १० महिन्यांचा कालावधी लागतो. नियोजनाचा अभावऊस तोडणीचे नियोजन व्यवस्थित नसते. तोडणी करणार्या मजुरांना तीन ते चार हजार रुपये द्यावे लागतात. शिवाय त्यांच्या भोजनाची व्यवस्था करावी लागते. यातच उसाची हिरवी पाने लागू नयेत यासाठी मजूर ऊस जाळतात. त्यात उसाचे वजन कमी होते. यामुळे शेतकर्यांचे नुकसान होते. पाण्याची गरज अधिकऊस केळीसारखेच नाजूक पीक आहे. ४० अंश सेल्सीअसपेक्षा अधिक तापमानात ते व्यवस्थितपणे येत नाही. त्याला केळीपेक्षा अधिक पाणी लागते. मागील तीन वर्षे पर्जन्यमान जेमतेम होते. भूजलपातळी घटल्याने अनेक शेतकर्यांनी ऊस लागवड टाळल्याची माहिती मिळाली. तीन्ही कारखान्यांच्या क्षेत्रात जेमतेम लागवडमधुकर, चोपडा व आणि मक्ताई कारखान्याच्या क्षेत्रात, लगतच्या भागात उसाची लागवड फारशी नाही. मधुकर कारखाना असलेल्या यावल तालुक्यात १४८६ हेक्टर लागवड आहे.ऊस लागवडीची माहिती(लागवड हेक्टरमध्ये)भुसावळ- ९१बोदवड- १९८यावल- १४८६रावेर- ९६मुक्ताईनगर- ६७भडगाव- ६००अमळनेर- ०३एरंडोल- ३४धरणगाव- ०५पारोळा- २४चोपडा- २४२पाचोरा- ५८चाळीसगाव- २२६६जामनेर- ४३ऊस लागवडीत आडसालीचे क्षेत्र १३०२, सुरू ९४५, खोडवा १०६१ खोडवा आहे. त्यात सुरू उसाचे क्षेत्र आणखी वाढू शकते, अशी शक्यता कृषि उपसंचालक पी.के.पाटील यांनी व्यक्त केली.