नवी दिल्ली- दिल्लीतील एका एटीएममधून चक्क दोन हजार रुपयाची अर्धी नोट बाहेर आली. एटीएममध्ये एक व्यक्ती पैसे काढालया गेला असताना त्याला एटीएममधून दोन हजारांची अर्धी नोट मिळाली. दिल्लीतील जामिया परिसरात राहणाऱ्या मोहम्मद शादाब डीसीबी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला. त्याने ज्यावेळी पैसे काढले तेव्हा त्याला एक विचित्र प्रकाराची दोन हजार रुपयांची नोट मिळाली. ही नोट अर्धीच छापलेली होती तर तिचा अर्धा भाग कोरा कागद होता. कोणीतरी फाटलेल्या नोटेला कागद जोडल्याचे शादाबला तेथे दिसून आलं.
शाबादने एटीएममधू दहा हजार रूपये काढले होते. या दहा हजारांपैकी एक दोन हजार रूपयांची नोट खोटी बाहेर आली, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
मोहम्मद शाबाद या व्यक्तीचं येस बँकेत खातं आहे. एटीएममधून खोटी नोट बाहेर आल्यावर मी त्या संदर्भाती तक्रार ग्राहक सेवा अधिकाऱ्यांकडे केली. पण अधिकाऱ्यांनी योग्य उत्तरं न दिल्याने मी पोलीसात तक्रार दाकल केल्याचं मोहम्मद शाबाद यांनी सांगितलं.
शादाबने या प्रकरणाची बँक तसेच स्थानिक पोलीस स्थानकामध्ये तक्रार केली आहे. पोलिसांनी आयपीसी कलम 420 म्हणजेच फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन घेतला आहे. या तक्रारीत म्हटल्याप्रमाणे शादाबने एटीएममधून दहा हजार रुपये काढले. ज्यामध्ये दोन हजार, ५०० आणि १००च्या नोटांचा समावेश होता. मात्र त्याने नोटा मोजल्या त्यावेळी त्याला ही कागद जोडलेली नोट आढळून आली. दरम्यान, पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.