नवी दिल्ली - प्रचंड उकाडा आणि उष्णतेच्या लाटेचा प्रकोप भारतासह संपूर्ण जगात पाहायला मिळत आहे. बिहारमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे दीडशेहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान उन्हाळ्याच्या वाढत्या प्रकोपाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पुढच्या काळात जागतिक तापमानवाढीच्या वेगावर नियंत्रण न मिळवल्यास जगभरात उष्णतेचा प्रकोप मोठ्या प्रमाणावर वाढेल. त्यामुळे भारतासारख्या उष्ण कटीबंधातीलच नव्हे तर अमेरिकेसारख्या देशातील शहरांमध्येही हजारो जणांचा मृत्यू होऊ शकतो. या संदर्भातील एक अहवाल ऑस्ट्रेलियामधील हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कार्बनचे उत्सर्जन कमी न झाल्यास असाच कडक उन्हाळा पडत राहील त्यामुळे वर्षागणिक परिस्थिती बिघडत जाईल, असे या अहवालात म्हटले आहे. तसेच वाढत्या तापमानाचा प्रभाव जगभरातील ५८ टक्के भारावर दिसून येईल. त्यामुळे उष्णतेचे जुने विक्रम मोडले जातील, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली.
...तर अर्धे जग होईल उष्णतेच्या लाटेची शिकार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 11:00 PM