गेल्या 7 ऑक्टोबरला इस्रायलवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या हमासच्या एका नेत्याने शुक्रवारी केरळच्या मलप्पुरममध्ये सॉलिडेरिटी यूथ मूव्हमेंटने आयोजित केलेल्या एका रॅलीत भाग घेतला होता. सॉलिडेरिटी यूथ मूव्हमेंट ही जमात-ए-इस्लामीची युवा शाखा आहे. एका व्हिडिओमध्ये हमास या दहशतवादी संघटनेचा नेता खालिद माशेल लोकांना संबोधित करताना दिसत आहे.
माध्यमांतील वृत्तानुसार, हमासचा दहशतवादी खालिद माशेलने या रॅलीला ऑनलाइन पद्धतीने संबोधित केले. माशेलच्या भाषणाचा भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांनी निषेध केला आहे. त्यांनी केरळ पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, या कार्यक्रमातील माशेलच्या सहभागा विरोधात कारवाईचीही मागणी केली आहे.
सुरेंद्रन यांनी एक्सवर (ट्विटर) म्हटले आहे, "मलप्पुरममध्ये सॉलिडेरिटी कार्यक्रमात हमास नेता खालिद माशेलचे व्हर्च्युअल संबोधन हा चिंतेचा विषय आहे. पिनाराई विजयन यांचे केरळ पोलीस कुठे आहेत? 'सेव्ह पॅलेस्टाइन'च्या आडून, ते दहशतवादी संघटना हमास आणि त्यांच्या नेत्यांचा 'योद्धा' म्हणून गौरव करत आहेत. हे अस्वीकार्य आहे."