नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशातील हमीरपूर जिल्ह्यातील सरकारी शाळेत एका विद्यार्थ्याने आपल्या शिक्षकाच्या कानाशिलात लगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्गात मोबाईल आणल्याने शिक्षक विद्यार्थ्याला ओरडले. ओरडल्यामुळे संतापलेल्या बारावीच्या विद्यार्थ्याने थेट शिक्षकावरच हात उगारला आहे. त्यावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण हाणामारीवर आले. या घटनेची माहिती शाळा व्यवस्थापनाला देण्यात आली. मात्र हे प्रकरण शांत करण्यात आलं असून पोलिसांनी तक्रार दाखल केली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, कानाखाली मारल्याच्या घटनेनंतर शाळा व्यवस्थापनाने प्रकरण शांत केले. शाळेचं नाव खराब होऊ नये म्हणून दोन्ही बाजूंनी प्रयत्न केले. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत शाळा व्यवस्थापनाने प्रकरण शांत केलं होतं. विद्यार्थ्याचा स्वभावही उद्धट असल्याचं सांगण्यात येत आहे. बारावीचा विद्यार्थी मोबाईल घेऊन शाळेत पोहोचला होता. मोबाईल शाळेत आणल्याबद्दल शिक्षकाने आक्षेप घेत विद्यार्थ्याला खडसावले. यानंतर विद्यार्थी कुटुंबीयांसह शाळेत गेला आणि शिक्षकावर हात उगारला.
शाळेतील शिक्षकावर विद्यार्थ्याने हात उगारल्याची माहिती अधिकृतपणे मिळालेली नाही, असे शिक्षण विभागाचे उपसंचालक दिलवरजित चंद्र यांनी सांगितले. मात्र शाळा व्यवस्थापनाशी चर्चा केली जाईल, असंही ते म्हणालेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये काही विद्यार्थी 59 वर्षीय शिक्षक प्रकाश बोगर यांच्यासोबत विचित्र मस्करी करताना दिसत आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या डोक्यात कचऱ्याचा डब्बा टाकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे, कर्नाटकच्या देवनागिरी जिल्ह्यातील चेन्नागिरी तालुक्यातील नेल्लारू सरकारी विद्यालयातील ही घटना असल्याचं सांगितलं जात आहे. एका शिक्षकासोबत शाळेतील विद्यार्थ्यांनी असं कृत्य केलं जे पाहून सगळेच संतापले आहेत. मात्र वयस्कर शिक्षकाने मुलांना अशा धडा शिकवला, जो ते आयुष्यभर लक्षात ठेवतील.
विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या डोक्यात टाकला कचऱ्याचा डब्बा पण तरीही गुरुंनी निभावलं कर्तव्य
कर्नाटकच्या एका सरकारी शाळेमध्ये दहावीत शिकणाऱ्या 6 विद्यार्थ्यांनी शिक्षकाचा छळ केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यानंतर लोकांनी विद्यार्थ्यांविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली. काहींनी या विद्यार्थ्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्याचा सल्ला दिला. तर काहींनी या विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाका असं म्हटलं. प्रकाश बोगर पुढील वर्षी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यामुळे या मुलांचं उज्वल भविष्य खराब करायला नको, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रकाश बोगर यांनी जे काही केलं ते फक्त एक गुरुच करू शकतो. त्यांनी लोकांना विनंती केली की त्या विद्यार्थ्यांना माफ करा. त्यांच्याविरोधात कोणीही तक्रार दाखल करू नका आणि शाळेतून काढूनही टाकू नका.