नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात एलएसी सीमेववर भारत-चीन सैन्यांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. या शहीद जवानांमध्ये हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील 21 वर्षीय अंकुश ठाकूर यांच्याही समावेश आहे.
अंकुश ठाकूर हे 2018 मध्ये भारतीय लष्कराच्या पंजाब रेजिमेंटमध्ये दाखल झाले होते. ते शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या गावात शोककळा पसरली असून त्यांच्या घराजवळ मोठ्या संख्येने लोक जमा होत आहेत.
कड़होता गावचे रहिवासी अंकुश ठाकूर यांनी दहा महिन्यांपूर्वी लष्करातून सुट्टी घेतली होती. त्यानंतर ते पुन्हा लष्कर सेवेत रुजू झाले होते. अंकुश ठाकूर यांचे वडील आणि आजोबा यांनी सुद्धा भारतीय लष्करात सेवा बजावली आहे. अवघ्या 21 व्या वर्षी अंकुश ठाकूर यांनी देशासाठी आपले प्राण दिले.
लष्कर मुख्यालयातून कड़होतामधील जवान शहीद झाल्याची बातमी मिळाली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत कळविण्यात आले आहे. अंकुश ठाकूक शहीद झाल्याची माहिती मिळताच गावात शोककळा पसरली आहे, असे एसडीएम भोरंज अमित शर्मा यांनी सांगितले.
याचबरोबर, आज सायंकाळपर्यंत अंकुश ठाकूर यांचे पार्थिक गावात पोहोचेल, असे सांगण्यात येते. तसेच, अंकुश ठाकूर यांच्या लहान भाऊ इयत्ता सहावीमध्ये शिकत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, भारत आणि चीनमध्ये सोमवारी दुपारपासून सुरु झालेल्या हिंसक धुमश्चक्रीमध्ये चीनचे 43 हून सैनिक मारले गेले आहेत. तर भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत. चीनच्या सैनिकांनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो त्यांच्याच अंगलट आला आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून चीन भारतीय हद्दीमध्ये घुसखोरी करून भारताला चिथावणी देत होता. एलएसीवर दोन्ही देशांदरम्यान चर्चा सुरु होती. या चर्चेवेळी काही अंतर चीन मागे सरकला होता. मात्र, सोमवारी चीनने भारताच्या पाठीत खंजीर खुपसला.
युद्धात सारे काही माफ असते म्हणतात. मात्र, दिलेला शब्द पाळणे हे देखील तेवढेच महत्वाचे असते. मात्र, चीनने मागे हटण्याचा शब्द मोडला आणि नव्या दमाचे सैनिक घेऊन भारतीय सैन्यावर हल्ला करण्यासाठी परतला.
आणखी बातम्या...
ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास केल्यास शिक्षा होणार नाही? रेल्वे अनेक तरतुदी हटविण्याच्या तयारीत
21 जूनला होणार जगाचा अंत? जाणून घ्या, माया कॅलेंडरच्या दाव्यामागील सत्य...
चिनी सैन्याला आता उत्तर देण्याची वेळ आली आहे - कॅप्टन अमरिंदर सिंग
तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय, 13.35 लाख लोकांना मिळणार आर्थिक मदत
मानसिक रुग्णांना विमा का मिळत नाही?, सुप्रीम कोर्टाचा केंद्र सरकारला सवाल
पाण्यापेक्षा कच्चे तेल स्वस्त! मग पेट्रोल 10 दिवसांत 5 रुपयांपेक्षा महाग का झाले?