हातकडी सोडून झाला फरार
By admin | Published: July 30, 2016 6:40 PM
रामानंद नगर पोलीस स्टेशनला लॉकअपची सुविधा नसल्याने पोलिसांनी चोरट्याला ठाणे अंमलदाराच्या शेजारील एका खोलीत बसवले. त्याच्या हातात बेड्याही ठोकण्यात आल्या.पहाटेच्या सुमारास तो केव्हा पसार झाला हे पोलिसांनाही कळले नाही. तक्रारदार संजय पाटील हे सकाळी पोलीस स्टेशनला गेले तेव्हा पाहिले तर चोरटाच गायब झाल्याचे लक्षात आले. दरम्यान, तो अल्पवयीन असल्याचे सांगून त्याला सोडून दिले असे पोलिसांनी पाटील यांना सांगितले.
रामानंद नगर पोलीस स्टेशनला लॉकअपची सुविधा नसल्याने पोलिसांनी चोरट्याला ठाणे अंमलदाराच्या शेजारील एका खोलीत बसवले. त्याच्या हातात बेड्याही ठोकण्यात आल्या.पहाटेच्या सुमारास तो केव्हा पसार झाला हे पोलिसांनाही कळले नाही. तक्रारदार संजय पाटील हे सकाळी पोलीस स्टेशनला गेले तेव्हा पाहिले तर चोरटाच गायब झाल्याचे लक्षात आले. दरम्यान, तो अल्पवयीन असल्याचे सांगून त्याला सोडून दिले असे पोलिसांनी पाटील यांना सांगितले.हॉटेलमधील वेटरच्या बॅगा लंपासमहामार्गाला लागून असलेल्या एका हॉटेलमधील चार ते पाच वेटरच्या बॅगाही त्याने लंपास केल्या होत्या. तारांच्या जाळीतून त्याने हॉटेलमध्ये प्रवेश केला होता. संजय पाटील यांना सापडलेला मोबाईल याच हॉटेलच्या वेटरचा निघाला. या बॅगा सकाळी काही अंतरावर सापडल्या तर पाटील यांच्याही पॅँट घरापासून काही अंतरावर सापडल्या. त्यातील शंभर रुपये मात्र त्याने चोरून नेले होते.