शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

हातमाग कामगार व्यवसायापासून दूर

By admin | Published: May 06, 2016 2:34 AM

उत्पन्नाअभावी देशातील हातमाग कामगारांची संख्या कमी होत असून, बहुतेक कुटुंबांनी तो व्यवसाय सोडून दिल्याची माहिती गुरुवारी लोकसभेत देण्यात आली.

नवी दिल्ली : उत्पन्नाअभावी देशातील हातमाग कामगारांची संख्या कमी होत असून, बहुतेक कुटुंबांनी तो व्यवसाय सोडून दिल्याची माहिती गुरुवारी लोकसभेत देण्यात आली.प्रश्नोत्तराच्या तासात वस्त्रोद्योगमंत्री संतोष गंगवार म्हणाले की, हातमाग कामगारांची परिस्थिती सुधारण्यासाठी सरकारने एक योजना आखली असून, त्यानुसार या हातमाग कामगारांना दररोज किमान ५०० रुपये उत्पन्न मिळावे हा त्यामागचा हेतू आहे. या उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी ७ आॅगस्ट हा ‘राष्ट्रीय हातमाग दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. याशिवाय ‘भारत हॅण्डलूम ब्रॅण्ड’ सुरू करण्यात आला असून, त्याद्वारे या उत्पादनाचा लोकांना दर्जा समजावून सांगण्याचा सरकारचा हेतू आहे. आमच्या या प्रयत्नांचे चांगले परिणाम दिसत आहेत. याबाबत एक क्लस्टर तयार करण्यासाठी मंजूर करण्यात आलेला ६० लाख रुपयांचा निधी वाढवून २ कोटी रुपये करण्यात आला आहे. पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना मंत्रीमहोदय म्हणाले की, हातमाग आणि पॉवरलूम या दोन्ही क्षेत्रातील उत्पादन वाढावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आधुनिकतेचा अभाव, उत्पादनविषयक पायाभूत सेवांचा अभाव, दुर्बल वित्तीय स्थिती यामुळे पॉवरलूम क्षेत्रापुढे विविध समस्या उभ्या राहिल्या आहेत.