ऑनलाइन लोकमत
कैमूर (बिहार), दि. 6 - लग्न समारंभातून खुर्च्या चोरल्याच्या आरोपाखाली दोघांना झाडाला उलटं टांगून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनबरसा गावात ही घटना घडली आहे. राजकुमार बिंद आणि बिरबल बिंद यांच्यावर हा चोरीचा आरोप करण्यात आला होता. यानंतर त्यांना एका झाडाला उलटं टांगण्यात आलं आणि गावातील एका पेहलवानाने त्यांना जबर मारहाण केली.
स्थानिकांनी दिलेल्या माहितनुसार गावातील पेहलवान महंगू बिंद यांच्या घरी लग्नसमारंभ होता. मुलीचं लग्न लाऊन वरात पुन्हा घरा परतली तेव्हा महंगू यांना आपल्या घरात जितक्या खुर्च्या मागवल्या होत्या, त्यामधील पाच कमी झाल्या आहेत असं लक्षात आलं.
Kaimur (Bihar): Two men tied upside down and beaten for stealing chairs from a wedding pic.twitter.com/UXRfVlryJ7— ANI (@ANI_news) June 6, 2017
यानंतर त्यांनी राजकुमार बिंद आणि बिरबल बिंद यांच्यावर चोराची आळ घेतला. त्यांनी दोघांनाही झाला उलटं टांगलं आणि जबर मारहाण केली. त्यांच्या कुटुंबियांनी जोपर्यच पाच खुर्च्यांचे पैसे दिले नाहीत तोपर्यंत त्यांना ही मारहाण सुरु होती. पैसे मिळाल्यानंतरच त्यांना सोडून देण्यात आलं.