नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींची साधना आणि तपश्चर्येबद्दल आपण अनेकदा ऐकले आहे. तसेच एका सामान्य कुटुंबातील मुलगा ते देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची मजल नरेंद्र मोदींनी मारली. आज मोदींचा थाट-माट आणि राजकारणातील त्यांची धमक आपणास पाहायला मिळत आहे. मात्र, मोदी या राजकारणापासून दूर राहू इच्छित होते. राजकारणात येण्याची त्यांची मूळीच इच्छा नव्हती. ते संन्यासी बनू इच्छित होते. पण, एका गुरुचे त्यांच्या जीवनात आगमन झाले आणि मोदींचा जीवनप्रवास बदलला.
सन 1966 साली बेलूर मठाचे स्वामी आत्मास्थानंद राजकोट येथील आश्रमात आले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनी प्रेरीत होते. त्यामुळे मोदी स्वामी आत्मास्थानंद यांना भेटण्यासाठी राजकोट आश्रमात पोहोचले. त्यापूर्वी मोदी हे अध्यात्म शिकत होते. त्यामुळे मोदींनी स्वामींसोबत राहून अध्यात्म शिकण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, स्वामींनी मोदींना इच्छा धुडकावत तूम्ही संन्यास घेण्यासाठी जन्मले नाहीत. तसेच, राजकोट आश्रम सन्यासी बनण्याची दीक्षा देत नसल्याचेही स्वामींनी म्हटले. जर, तुम्हाला संन्यास घ्यायचा असेल तर तुम्हाला बेलूर मठात जावे लागले, त्यासाठी स्वामींनी बेलूर मठाचे अधिपती माधवानंद यांना याबाबत चिठ्ठी लिहिली. त्यानंतर, मोदींनी स्वामी माधवानंद यांची भेट घेतली. मात्र, स्वामी माधवानंद यांनीही मोदींची इच्छा धुडकावत, तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी आहात, संन्यास घेण्यासाठी नाही, असे सांगितले. त्यामुळे आपले गुरू स्वामी आत्मास्थानंद यांच्यासोबत मोदी पुन्हा राजकोट आश्रमात परतले. त्यानंतर, मोदींनी आरएसएसचे सदस्यत्व स्विकारले आणि काही दिवसांतच ते राजकारणात सक्रीय झाले. गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतरही मोदींनी स्वामी आत्मास्थानंद यांचे दर्शन घेतले. तसेच पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतरही मोदींच्या पॉकेटमध्ये एक फूल होते. जे फूल स्वामी आत्मास्थानंद यांनी मोदींनी आशिर्वाद म्हणून दिले होते. दरम्यान, स्वामी आत्मास्थानंद यांनीच मोदींना राजकारणात सक्रीय होण्यास सूचवले होते, असेही सांगण्यात येते.