काही दिवसापासून बाबा केदारनाथ मंदिर कधी उघडणार याची चर्चा सुरू आहे. आज शिव भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. १० मे रोजी केदारनाथचे दरवाजे उघडणार आहेत. ओंकारेश्वर मंदिर उखीमठमध्ये आज ही तारीख घोषित करण्यात आली. शुभ मुहूर्तावर सकाळी ७ वाजता दरवाजे उघडले जाणार आहेत.
भाजपाची दिल्लीत मॅरेथॉन बैठक, महाराष्ट्रातील जागावाटपावरही चर्चा; नव्या १० चेहऱ्यांना संधी
उत्तराखंडचा आरोग्य विभाग चारधाम यात्रा सुरळीत आणि सुरक्षित पार पाडण्याची तयारी करत आहे. यासह चारधाम यात्रेपूर्वी बद्रीनाथ आणि केदारनाथमध्ये रुग्णालये सुरू करण्यात येणार आहेत. या रुग्णालयांसाठी उपकरणे खरेदी करण्यास मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे आरोग्य सचिव डॉ. आर. राजेश कुमार यांनी सांगितले. याशिवाय यात्रेकरूंना तत्काळ आरोग्य सेवा मिळावी यासाठी चारधाम यात्रा मार्गावर अनुभवी व प्रशिक्षित वैद्यकीय पथके तैनात करण्यात येणार आहेत. यासोबतच त्यांनी यात्रेकरूंना चारधाम यात्रेसाठी येण्यापूर्वी त्यांची वैद्यकीय चाचणी करून घेण्याचे आवाहन केले.
आरोग्य सचिव डॉ. आर. राजेश कुमार म्हणाले, “मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि आरोग्य मंत्री डॉ. धनसिंग रावत यांच्या सूचनेनुसार विभाग चारधाम यात्रेच्या तयारीत व्यस्त आहे. चारधाम यात्रेसंदर्भात मुख्य सचिव राधा रातुरी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक झाली, त्यात चारधाम यात्रेच्या पूर्वतयारीसोबतच सर्व विभागांमधील समन्वय सुधारण्याबाबत चर्चा करण्यात आली'.
"यावेळी यात्रेकरूंच्या सोयीसाठी सुमारे १५० जणांचे वैद्यकीय पथक चारधाममध्ये तैनात करण्यात येणार आहे. या टीमला उंचावर काम करण्याचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. १५-१५ दिवस डॉक्टर्स तैनात केले जातील, अशी माहितीही त्यांनी दिली.