शहरं
Join us  
Trending Stories
1
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
2
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
3
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
4
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
5
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
6
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
7
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
8
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
9
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
10
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
11
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
12
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
13
'भाऊ बोलून गळा पकडायचा!' अंकिताने सूरजला केलं टार्गेट, DP चांगलाच भडकला! प्रोमो बघाच
14
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
15
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
16
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
17
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
18
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
19
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
20
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी

हरभजन कौरची 51 वर्षांनी कराचीमध्ये मुलांशी भेट

By admin | Published: February 13, 2017 1:27 PM

अमृतसरच्या हरभजन कौर यांची करुण कहाणी ऐकल्यास 'बजरंगी भाईजान' आणि 'गदर' सिनेमांहून तुम्हाला अधिक दुःख होईल.

ऑनलाइन लोकमत नवी दिल्ली, दि. 13 - अमृतसरच्या हरभजन कौर यांची करुण कहाणी ऐकल्यास 'बजरंगी भाईजान' आणि 'गदर' सिनेमांहून तुम्हाला अधिक दुःख होईल. कौर यांच्या आयुष्यात चक्रीवादळ आलं आणि त्यात सर्व काही उद्ध्वस्त झालं. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीमुळे त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी मिळाली. अमृतसरच्या राजासांसी येथे राहणारी हरभजन कौर 1946मध्ये लग्नानंतर लाहौरमध्ये स्थायिक झाली. मात्र त्यानंतर 1947ला भारताच्या विभाजनादरम्यान कौर आणि त्यांच्या सासरकडचे लोक लाहौर सोडण्यासाठी निघाले असतानाच रस्त्यात झालेल्या दंगलीत त्यांचे पती आणि सासरकडच्या मंडळींची हत्या करण्यात आली. त्यानंतर हरभजन कौरला कराचीतल्या अफजल खान नामक व्यक्तीनं वाचवलं. अफजल यांनी त्यांना भारतात पाठवण्याचे खूप प्रयत्न केले. मात्र ते अयशस्वी ठरले. अशा परिस्थितीत हरभजन कौर यांचे धर्मपरिवर्तन करून अफझल यांनी त्यांच्याशी निकाह केला. निकाहनंतर हरभजन कौरला शहनाज बेगम नाव देण्यात आलं. वेळेचं चक्र सुरूच राहिलं आणि हरभजन कौरला अफजलपासून 6 अपत्य झाली. मात्र त्यानंतर हरभजन कौरला भारतात जाण्याची संधी मिळाली. 1962च्या भारत-पाक व्हिजा नीतींतर्गत हरभजन अमृतसरमधल्या राजासांसी या वडिलांच्या गावी पोहोचली. मुलीला समोर पाहून आई-वडिलांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. त्यानंतर त्यांनी हरभजन कौरला पाकिस्तानात परत पाठवलं नाही. स्वतःच्या कुटुंबीयांमध्ये हरभजन अडकून पडली. मात्र पाकिस्तानातील स्वतःच्या सहा मुलांची आठवण तिला कायम सतावत राहिली. सहा अपत्यांमधील एकाच्या मृत्यूची बातमी तिच्या कानावर पडली आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. हरभजन कौरची परिस्थिती पाहून आईवडिलांनी तिचं अमृतसरमधल्याच एक गुरबचन सिंह नामक व्यक्तीशी लग्न लावून दिलं. परिस्थितीपुढे हरभजन कौरही हतबल झाली. गुरबचन सिंह यांच्या पत्नीचं निधन झालं होते. तसेच त्यांना रोमी नावाचा एक मुलगा होता. रोमी मोठा झाल्यावर हरभजन कौर यांनी त्याला स्वतःची हकीकत सांगितली. आईचं दुःख पाहून रोमीनं हरभजन कौरची पाकिस्तानातील मुलांशी भेट घडवून आणण्याचा निर्धार केला. 1989मध्ये रोमी अमेरिकेला गेला. त्यानंतर तो कॅनडामध्ये स्थायिक झाला. 2007मध्ये वडील गुरबचन यांच्या निधनानंतर त्यानं आईला स्वतःकडे आणलं. आई आणि मुलांची भेट घडवून आणण्यासाठी पाकिस्तानमधल्या ऊर्दू समाचार या वृत्तपत्रात रोमीनं जाहिरात दिली. ही जाहिरात हरभजन कौरची मोठी मुलगी खुर्शीदनं पाहिली आणि तिने रोमीशी संपर्क साधला. त्यानंतर खुर्शीद कॅनडात पोहोचली. खुर्शीदला पाहून 86 वर्षीय हरभजन कौरला अश्रू अनावर झाले. कॅनडाची राष्ट्रीयत असल्यानं हरभजन कौरला पाकिस्तानचा व्हिजा मिळाला. 7 फेब्रुवारी 2017ला हरभजन कौर कराचीत दाखल झाली. कराचीत हरभजन कौरला पाच मुलांच्या मोठ्या कुटुंबाची भेट झाली. 51 वर्षांनंतर 86 वर्षीय हरभजन कौरची इच्छा पूर्ण झाली. हरभजन कौरच्या मुलांची लग्न झाली होती. तसेच ती आजीदेखील झाली होती. कुटुंबात सर्व मिळून 42 नातू-नाती, सुना असा परिवार आहे. हरभजन कौरचा 9 एप्रिलपर्यंत व्हिजा वैध आहे. त्यानंतर तिला पाकिस्तानमधून परत जावं लागणार आहे.