नवी दिल्ली - नागरी उड्डण मंत्रालयाने देशांतर्गत उड्डाणांसाठी प्रवाशांची क्षमता वाढवून आता 80 टक्के करण्याचा निर्मय घेतला आहे. नागरी उड्डाणमंत्री हरदीप पुरी यांनी ही घोषणा केली. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ''25 मेरोजी 30 हजार प्रवाशांसह देशांतर्गत उड्डाणांना सुरुवात करण्यात आली. हे प्रमाण वाढून आता 2.52 लाखांवर पोहोचले आहे. आता सरकार देशांतर्गत उड्डाणांसाठी 80 टक्के प्रवासी क्षमतेची परवानगी देत आहे.''
कार्गासेवा, वंदे भारत मोहिमेला वगळले -या निर्बंधातून कार्गासेवा, वंदे भारत मोहीम आणि विशेष विमानांना वगळण्यात आले आहे. भारताने अमेरिका आणि इंग्लंडसह २० देशांसोबत ‘एअर बबल’ करार केला आहे. याअंतर्गत जुलै महिन्यापासून विशेष उड्डाणे सुरू करण्यात आली आहेत, तर देशांतर्गत विमानसेवेला २५ मेपासून परवानगी देण्यात आली आहे.