कॅनेडियन पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंह निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI ने हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. निज्जरच्या जवळ जाणे त्याच्या ओळखीच्या व्यक्तीशिवाय अशक्य होते. भारताला बॅकफूटवर आणण्यासाठी आयएसआय निज्जरला संपवू इच्छित असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. राहत राव आणि तारिक कियानी हे कॅनडातील दोन आयएसआय एजंट आहेत जे पाकिस्तानी एजन्सीसाठी काम करत आहेत.
दिग्गज रिंगणात, शिवराज सिंह यांचा रस्ता काटेरी; तिसऱ्या यादीतही नाव नाही
भारतातून येणार्या आणि मोस्ट वॉण्टेड लिस्टमध्ये असलेल्या दहशतवाद्यांचाही तो हस्तक आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राव आणि कयानी यांचा निज्जरच्या हत्येमध्ये संभाव्य व्यावसायिक कारणांसाठी आणि नवीन ड्रग पेडलर्सकडून अधिक खंडणी मिळविण्यासाठी सहभाग असावा. निज्जर अत्यंत सजग आणि दक्ष असल्याने त्याच्या जवळ जाणे कोणत्याही अनोळखी व्यक्तीला अशक्य असल्याचेही सूत्रांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, मेजर जनरलपासून हवालदारापर्यंत अनेक माजी आयएसआय अधिकारी हरदीप सिंह निज्जरच्या शेजारी राहतात. राव आणि कयानी यांचे स्थानिक ड्रग्ज व्यवसायावर थेट नियंत्रण राहावे म्हणून निज्जरची हत्या करण्याचे काम यापैकी एकाला देण्यात आले असावे,अशी माहिती समोर आली आहे. निज्जर कालांतराने शक्तिशाली होत आहेत आणि स्थानिक कॅनेडियन समुदायातही त्यांची लोकप्रियता वाढत आहे.
राहत राव, तारिक कियानी आणि फुटीरतावादी नेता गुरचरण पुनुन हे ड्रग्ज आणि इमिग्रेशन व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी या ऑपरेशनमध्ये सामील होते,यातुन तो पैसा मिळवत होता. हरदीपसिंह निज्जरची पाकिस्तानस्थित वाधवा सिंह आणि रणजित सिंह नीता यांसारख्या समुदायातील नेत्यांशी जवळीक आणि संबंधही आयएसआयसाठी अडचण होती.