नवी दिल्ली : पाटीदार आरक्षण आंदोलनातील युवा नेतृत्व हार्दिक पटेल यांची गुजरात काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.पक्षाच्या वतीने सांगण्यात आले की, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी हार्दिक पटेल यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे.१२ मार्च २०१९ रोजी हार्दिकपटेल यांनी काँग्रेस पक्षात प्रवेशकेला होता. मात्र, एकाप्रकरणात दोषी ठरविल्यामुळे त्यांनी लोकसभा निवडणूक लढविली नव्हती.अर्थात, पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला समर्थन दिले होते. त्यामुळे ते काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतील, अशी अटकळ राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात होती. अमित चावडा हे सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत.गुजरात काँग्रेस पक्षाचे प्रभारी राजीव सातव यांनी सांगितले की, राज्य काँग्रेस समिती काही दिवसांपूर्वीच बरखास्त करण्यात आली होती आणि नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येतील.काँग्रेस अध्यक्षांनी तीन जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीला मंजुरी दिली आहे. महेंद्रसिंह एच. परमार (आनंद), आनंद चौधरी (सुरत) आणि यासीन गज्जन (व्दारका) यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी हार्दिक पटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 4:58 AM