शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

हार्दिक पटेल उद्या काँग्रेसमध्ये प्रवेश करणार, ट्विटरवरून केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 09:09 IST

गुजरातमधील पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भाजपाला आव्हान देणारे हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देगुजरातमधील पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भाजपाला आव्हान देणारे हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मंगळवारी (12 मार्च) हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. गुजरातच्या जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढविणार असल्याची माहिती याआधी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. 

बडोदा - गुजरातमधील पटेल समुदायाला आरक्षण देण्यावरून सत्ताधारी भाजपाला आव्हान देणारे हार्दिक पटेल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत मंगळवारी (12 मार्च) हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. स्वत: हार्दिक यांनी ट्विटरवरून याबद्दलची माहिती दिली. गुजरातच्या जामनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूकही लढविणार असल्याची माहिती याआधी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी दिली आहे. 

12 मार्चला अहमदाबाद येथे काँग्रेसची एक बैठक होणार आहे. यावेळी हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या बैठकीला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीदेखील उपस्थित राहणार आहेत. ज्या जामनगर मतदारसंघातून हार्दिक पटेल उभे राहणार आहेत तेथून सध्या भाजपाच्या पूनमबेन मादम खासदार आहेत. गुजरात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बालेकिल्ला असून विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने त्यांना नाकीनऊ आणले होते. हार्दिक पटेल यांनी काँग्रेसला मोठी मदत केली होती. यामुळे काँग्रेस गुजरातमध्ये लक्ष केंद्रीत करणार आहे. 

हार्दिक पटेल यांनी 21 फेब्रुवारीला उत्तरप्रदेशमध्ये सपा मुख्यालयात अखिलेश यादव यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी पटेल यांनी सपा-बसपा युतीचे स्वागत केले होते. तसेच ही युती भाजपाला हरवू शकते असेही म्हटले होते. लोक भाजपापासून त्रासलेले असून त्याना सुटका हवी आहे, असे वक्तव्य पटेल यांनी केले होते. महत्त्वाचे म्हणजे या युतीमध्ये काँग्रेसला वगळण्यात आले आहे. 

गुजरात मॉडेलचे खरे रुप...

हार्दिक पटेल यांनी यावेळी तथाकथीत गुजरात मॉडेलवरही टीका केली होती. आज जे गुजरात मॉडेल अवघ्या देशभरात खपवले जात आहे. त्याच गुजरातच्या 20 जिल्ह्यांमध्ये शेतासाठी पाणी मिळणे मुश्कील बनले आहे. आज शेतकरी, तरुण, महिला सर्व त्रासलेले आहेत. जो ही सरकारला प्रश्न विचारतो त्याला देशद्रोही ठरविले जाते. आम्हाला या लोकांनी देशभक्ती काय असते हे शिकविण्याची गरज नाही, असेही हार्दिक यांनी म्हटले होते. 

पटेल समाजाला ओबीसी आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून 2015 मध्ये आंदोलन उभे राहिले होते. यावेळी हिंसाही झाली होती. तसेच चिथावणी दिल्याने झालेल्या तोडफोडप्रकरणी हार्दिक पटेल यांना दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. 

Lok Sabha Election 2019: 11 एप्रिल ते 19 मे... 'असे' आहेत लोकसभा निवडणुकीचे सात टप्पेलोकसभानिवडणूक कधी होणार?, या देशवासीयांना पडलेल्या प्रश्नाचं उत्तर अखेर रविवारी (10 मार्च) मिळालं आहे. लोकसभेची निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून मतदान 11 एप्रिल ते 19 मे या काळात सात टप्प्यांमध्ये होणार आहे. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये मतदान होणार असून 23 मे रोजी निकाल जाहीर होईल. 16व्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून रोजी संपणार आहे. त्यामुळे त्याआधी देशात नवं सरकार स्थापन होईल. 

17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांत 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्याला 11 एप्रिल रोजी सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रातील निवडणुकांचा पहिला टप्पाही 11 एप्रिलपासूनच सुरू होईल. तर, 19 मे रोजी निवडणुकांच्या अंतिम टप्प्यातील मतदान पार पडेल. त्यामुळे 39 दिवसांत निवडणुक आटोपली जाणार आहे. त्यानंतर, 4 दिवसांनी मतदानाचा निकाल जाहीर होईल.

टॅग्स :hardik patelहार्दिक पटेलLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Gujaratगुजरातcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी