Hardik Patel to Join BJP : अखेर ठरलं! हार्दिक पटेल भाजपमध्ये करणार प्रवेश, काँग्रेसचा 'हात' सोडताच घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 11:33 AM2022-05-31T11:33:49+5:302022-05-31T11:39:29+5:30

तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये सामील झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिला.

Hardik Patel to join BJP on 2nd June he confirms He had recently quit Congress | Hardik Patel to Join BJP : अखेर ठरलं! हार्दिक पटेल भाजपमध्ये करणार प्रवेश, काँग्रेसचा 'हात' सोडताच घेतला निर्णय

Hardik Patel to Join BJP : अखेर ठरलं! हार्दिक पटेल भाजपमध्ये करणार प्रवेश, काँग्रेसचा 'हात' सोडताच घेतला निर्णय

Next

तीन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये सामील झालेले पाटीदार नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी नुकताच काँग्रेसचा राजीनामा दिला. या वर्षअखेर विधानसभेची निवडणूक होण्याआधीच त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे राजीनामा पाठवला. पाटीदार आरक्षणासाठी नेतृत्व केल्यानंतर २०१५ मध्ये हार्दिक चर्चेत आले होते. जुलै २०२० पासून ते गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष होते. यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा रंगल्या होत्या. आता खुद्द हार्दिक पटेल यांनीच या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

पाटीदार नेते हार्दिक पटेल हे गुरूवार २ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली. यापूर्वी त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत काँग्रेसला रामराम ठोकला होता. त्यानंतर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागलं होतं. ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील अशा चर्चाही राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.


व्यक्त केली होती नाराजी
“माझ्यासारखे कार्यकर्ते बैठकीत मुद्यांवर चर्चा करण्यासाठी एक दिवसात ५०० ते ६०० किलोमीटर प्रवास करतात. त्यांना आढळते की, नेते वरिष्ठांसाठी सँडविच उपलब्ध करण्यात व्यस्त आहेत. गुजराती लोकांच्या हिताशी संबंधित मुद्दे उपस्थित करण्याचा प्रयत्न केला असता वरिष्ठ मोबाईल फोनवर आणि अन्य बाबीत व्यस्त दिसले,” असं म्हणत त्यांनी यापूर्वी आपली नाराजी व्यक्त केली होती.

Web Title: Hardik Patel to join BJP on 2nd June he confirms He had recently quit Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.