हार्दिक पटेलांनी गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष होताच उत्साहात ट्विट केले; ट्रोल झाले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2020 06:46 PM2020-07-12T18:46:47+5:302020-07-12T18:48:47+5:30
हार्दिक पटेल यांना शनिवारी गुजरात काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले. यासाठी हार्दिक यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे आभार व्यक्त केले.
गुजरातच्या राजकारणात पाटीदार आंदोलनामुळे चर्चेत आलेल्या हार्दिक पटेल यांना गुजरातकाँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले आहे. अध्यक्ष बनताच न राहवलेल्या पटेल यांनी एक ट्विट केले आणि चांगलेच ट्रोल झाले. या ट्विटमध्ये त्यांनी असे सोनिया आणि राहुल गांधी यांचे आभार मानताना असे काही लिहिले की, लोकांनी लगेचच निशान्यावर घेण्यास सुरुवात केली. अखेर हार्दिक पटेल यांना ते ट्विट डिलीट करावे लागले आहे.
हार्दिक पटेल यांना शनिवारी गुजरात काँग्रेसचा कार्यकारी अध्यक्ष बनविण्यात आले. यासाठी हार्दिक यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचे आभार व्यक्त केले. तसेच 2022 मध्ये गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस एक तृतीयांश बहुमताने सरकार बनविणार असल्याचे ट्विटमध्ये म्हटले.
'' आदरणीय अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींचा मी आभार व्यक्त करते. लोकशाही आणि संविधान वाचविण्यासाठी काँग्रेस पक्ष लढत राहिल. गुजरातमध्ये विविध मुद्द्यांना महत्वा दिले जाणार आहे आणि 2022 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत 1/3 बहुमताने काँग्रेस सरकार बनवेल.'', असे ट्विट हार्दिक पटेल यांनी केले होते.
आदरणीय अध्यक्षा सोनिया गांधी जी एवं राहुल गांधी जी का आभार व्यक्त करता हूँ। लोकतंत्र एवं संविधान के बचाव के लिए कांग्रेस पार्टी लड़ती रहेगी। गुजरात के विभिन्न मुद्दों को महत्व दिया जाएगा और 2022 के गुजरात विधानसभा चुनाव में 2/3 बहुमत के साथ कांग्रेस सरकार बनायेंगी।
— Hardik Patel (@HardikPatel_) July 12, 2020
या ट्विटनंतर पटेल एवढे ट्रोल झाले की, त्यांना ते ट्विट डिलीट करावे लागले. खरेतर त्यांना सत्तास्थापनेसाठी निम्म्यापेक्षा जास्त जागा निवडून आणाव्या लागणार आहेत. परंतू त्यांच्या ट्विटचा अर्थ 33 टक्के जागांमध्येच सरकार स्थापन करणार असा होत होता. आता त्यांनी नवीन ट्विट केले असून त्यामध्ये 2/3 बहुमत म्हटले आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
गेहलोत सरकारची रात्री लिटमस टेस्ट; तातडीची बैठक, दोन डझन आमदार पायलटांकडे
कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे
Rajasthan political crisis: आमदारांनो! लवकर जयपूर गाठा, ज्याचा फोन बंद येईल...; गेहलोतांचे आदेश
मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार
हद्द झाली! अनुकंपाखाली नोकरी दिली नाही; लॉकडाऊनमध्ये तरुणाने SBI ची हुबेहूब शाखाच उघडली
मोठा दिलासा! पुन्हा पुन्हा वापरता येणार N95 मास्क; केवळ 90 मिनिटांत 'चक्र डिकोव्ह' करणार निर्जंतुक