ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. ११ - पटेल आरक्षण आंदोलनाचे नेता हार्दिक पटेल याचा जामीन अर्ज सोमवारी गुजरात मंजूर केला आहे. गेल्या शुक्रवारी हार्दिक पटेल याला देशद्रोह प्रकरणी जामीन मिळाला होता. आज हिंसाचाराच्या एका प्रकरणातही त्याला जामीन मिळाला आहे. हायकोर्टाने त्याला तीन महिने मेहसाणा जिल्ह्याबाहेर राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला असून त्याची जेलमधून उद्या सुटका होणार आहे. पटेल आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिकला देशद्रोहाच्या आरोपाखाली ऑक्टोबर २०१५ मध्ये अटक करण्यात आली होती. त्याच्याविरोधात अहमदाबाद आणि सूरतमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणात तीन दिवसांपूर्वीच ८ जुलै रोजी हार्दिकला हायकोर्टाने जामीन मंजूर केला. जामीन देताना जेलमधून सुटल्यानंतर सहा महिने गुजरातबाहेर राहावे, अशी अटही कोर्टाने घातली. मात्र, मेहसाणा जिल्ह्यातील विसनगर येथे स्थानिक आमदाराच्या कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी हार्दिकवर गुन्हा दाखल असल्याने त्याची त्याचदिवशी सुटका झाली नाही. मात्र, हार्दिकने त्याप्रकरणी जामिनासाठी केलेल्या अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी हायकोर्टाने त्याचा तीन महिने मेहसाणा जिल्ह्याबाहेर राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे.
हार्दिक पटेलचा जामीन अर्ज मंजूर
By admin | Published: July 11, 2016 7:34 PM