गुजरातमधील काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यावर संतप्त हार्दिक पटेल यांचे वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 10:43 AM2020-03-18T10:43:01+5:302020-03-18T10:43:56+5:30

182 सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपचे 103 आमदार असून काँग्रेसचे 73 आहेत. तर भारतीय ट्रायबल पार्टीचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आणि एक अपक्ष आमदार असून दोन जागा रिक्त आहेत. तीन्ही जागांवर जिंकण्यासाठी भाजपला 111 मतांची गरज आहे. तर काँग्रेसला दोन जागांवर जिंकण्यासाठी 74 मतांची आवश्यकता आहे.

Hardik Patel's controversial statement on the resignation of Congress MLAs in Gujarat | गुजरातमधील काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यावर संतप्त हार्दिक पटेल यांचे वादग्रस्त वक्तव्य

गुजरातमधील काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यावर संतप्त हार्दिक पटेल यांचे वादग्रस्त वक्तव्य

Next

नवी दिल्ली - राज्यसभा निवडणुकीपूर्वी गुजरातकाँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देणाऱ्या या आमदारांविषयी मंगळवारी काँग्रेसनेतेहार्दिक पटेल यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. गुजरातमधील चार राज्यसभा जागांसाठी 26 मार्च रोजी मतदान होणार आहे. हार्दिक पटेल म्हणाले की, जनतेला धोका देणाऱ्या आमदारांना चौकात फटके द्यायला हवे.

हार्दिक यांना आमदारांच्या खरेदीवर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. जनतेला धोका देणाऱ्या आमदारांना चारचौघांत फटकारायला हवे. भाजपकडून 20 ते 60 कोटी रुपयांत एक आमदार खरेदी करण्यात येत आहे. विकले जाणारे आमदार मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जावून पैसे घेत असल्याचा आरोप हार्दिक यांनी यावेळी केला.

गुजरात काँग्रेसमधील पाच आमदारांनी रविवारी राजीनामा दिला आहे. यामध्ये प्रवीण मारू, मंगल गावित, सोमाभाई पटेल, जेवी काकडिया आणि प्रद्युम्न जडेजा यांचा समावेश आहे. या पाच आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष त्रिवेदी यांनी सोमवारी मंजूर केले. त्यानंतर काँग्रेसकडून या नेत्यांना पक्षातून निलंबीत करण्यात आले आहे. 

दरम्यान 182 सदस्य असलेल्या गुजरात विधानसभेत भाजपचे 103 आमदार असून काँग्रेसचे 73 आहेत. तर भारतीय ट्रायबल पार्टीचे दोन, राष्ट्रवादी काँग्रेसचे एक आणि एक अपक्ष आमदार असून दोन जागा रिक्त आहेत. तीन्ही जागांवर जिंकण्यासाठी भाजपला 111 मतांची गरज आहे. तर काँग्रेसला दोन जागांवर जिंकण्यासाठी 74 मतांची आवश्यकता आहे.
 

Web Title: Hardik Patel's controversial statement on the resignation of Congress MLAs in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.