अहमदाबाद : गुजरात सरकारने आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी जाहीर केलेल्या पॅकेजवर नाराजी व्यक्त करीत राज्यातील पटेल आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी शुक्रवारी ‘लॉलीपॉप आंदोलना’ची घोषणा केली. राजकोट येथून या आंदोलनास प्रारंभ झाला.या पॅकेजमुळे पटेल समुदायाला फार काही लाभ होणार नाही. हे विशेष पॅकेज म्हणजे पटेल समुदायासाठी केवळ ‘लॉलीपॉप’ आहे, असा दावा हार्दिक यांनी केला. शिवाय याविरुद्ध ‘लॉलीपॉप आंदोलना’ची घोषणा केली. या आंदोलनांतर्गत गुजरात सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजविरुद्ध गावागावात, तालुक्या-तालुक्यात लॉलीपॉप वाटले जातील.
हार्दिक पटेल यांचे ‘लॉलीपॉप आंदोलन’
By admin | Published: September 27, 2015 5:22 AM