अहमदाबाद : पोलिसांनी परवानगी नाकारलेली असतांना पाटीदार अनामत आंदोलन समितीने संयोजन हार्दिक पटेल यांनी सोमवारी रोड-शो’ करुन जोरदार शक्तीप्रदर्शन केले. सुरक्षा, वाहतूक कोंडी आणि कायदा-सुव्यवस्थेच्या सबबीखाली पोलिसांनी काँग्रेस आणि भाजपला मंगळवारी रोड-शो’करण्यास मनाई केली आहे.हार्दिक पटेल यांनी मात्र पोलिसांचा आदेश झुगारुन अहमदाबाद शहराच्या मुख्य भागातून १५ किलोमीटरचा ‘रोड-शो’ला सुरुवात केला. त्यांच्या शेकडो समर्थकांनी मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांतून शानदार मिरवणूक काढली. परवानगी नसतांनाही हार्दिक यांनी रोड-शो केल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल. ज्या पद्धतीने हार्दिक पटेल यांच्या समर्थकांनी मिरवणूक काढून अटीचे उल्लंघन केले आहे, तेव्हा त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त ए. के. सिंह यांनी स्पष्ट केले.अहमदाबाद शहरातील भोपाळ भागातून पटेल यांच्या रोड-शो’ची सुरुवात करण्यात आली. निकोल येथे रोड-शो’चा समारोप होत आहे. हार्दिक पटेल यांच्या समर्थकांनी विशेषत: पाटीदार समुदायातील युवकांनी त्यांना पाठिंबा व्यक्त करून अभिवादन करण्यासाठी ‘रोड-शो’च्या मार्गावर मोठ्या संख्येने गर्दी केली आहे.काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी हेही उद्या, मंगळवारी रोड-शो करणार होते; परंतु, पोलिसांनी त्यांच्या ‘रोड-शो’ला परवानगी नाकारली आहे. भाजपच्या रोड-शो’लाही पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसºया टप्प्यात १४ डिसेंबर रोजी मतदान होणार असून दुस-या टप्प्यातील प्रचाराचा मंगळवार हा शेवटचा दिवस आहे.होणार कारवाई‘रोड-शो’ला सुरुवात केला. त्यांच्या शेकडो समर्थकांनी मोटारसायकल आणि चारचाकी वाहनांतून शानदार मिरवणूक काढली. परवानगी नसतांनाही हार्दिक यांनी रोड-शो केल्याने त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल.
आदेश झुगारून हार्दिकचा रोड-शो, कायदा-सुव्यवस्थेचे दिले कारण, काँग्रेस आणि भाजपला पोलिसांनी नाकारली परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 12:08 AM