नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या संकटातच उत्तराखंडमध्ये कुंभमेळा सुरू आहे. कुंभमेळ्यात अनेक संतांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले आहेत. मात्र, आता कुंभमेळ्यात कोरोना कुणामुळे पसरला, यावरून आखाडेच आमने-सामने आले आहेत. यातच कुंभमेळ्यात कोरोना संन्याशी आखाड्यामुळे पसरला, असा आरोप बैरागी आखाड्याने केला आहे. (Haridwar kumbh sant akahara fight over corona virus)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही आखाड्यांनी कोरोना समाप्तीचीही घोषणा केली आहे. मात्र, बैरागी आखाड्याचे म्हणणे आहे, की संन्याशी आखाड्यामुळेच कुंभमेळ्यात कोरोना पसरला. बैरागी आखाड्याने तो पसरवला नाही. तसेच, कोणताही एक अथवा दोन आखाडे कुंभ समाप्तीचा निर्णय घेऊ शकत नाहीत. बैरागी आखाड्याशिवाय, निर्मोही आखाड्याचे अध्यक्ष महंत राजेंद्र दास यांनी म्हटले आहे, की कुंभमेळ्यातील वाढत्या कोरोना संक्रमणाला आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी हे जबाबदार आहेत.
CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!
कुंभमेळ्यात जवळपास 50 संत कोरोना पॉझिटिव्ह -कुंभमेळ्यात 14 एप्रिललाच शाही स्नान झाले आहे. यानंतर ज्या बातम्या येत आहेत त्या धडकी भरवणाऱ्या आहेत. कुंभमेळ्यात आतापर्यंत 50 हून अधिक साधूंना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासांतच जूना निरंजनी आणि आह्वान आखाड्याचे अनेक साधू कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. कुंभमेळ्यात सातत्याने कोरोना रुग्णांत वाढ होत असल्याने हरिद्वार प्रशासनाने रँडम सँपलिंगला सुरुवात केली आहे. हरिद्वारमध्ये आता वेगवेगळ्या ठिकाणी कोरोना तपासणी सुरू आहे.
निरंजनी आखाड्याने केलीय कुंभ समाप्तीची घोषणा - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रोजच्या रोज दोन लाखहून अधिक रुग्ण आता समोर येऊ लागले आहेत. तर दुसरीकडे उत्तराखंडमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. येथे लाखोलोक एकत्र आले आहेत. यातच निरंजनी आखाड्याने त्यांच्यावतीने कुंभ संपल्याची घोषणा केली आहे.
हरिद्वार येथील कोरोना स्थिती -एकूण कोरोनाबाधित - 19,575सक्रिय रुग्ण - 3612आतापर्यंत झालेले मृत्यू - 180