शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Harnaj Sandhu : मिस युनिव्हर्ससोबत शशी थरुर यांचा सेल्फी, नेटीझन्सने दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2021 2:05 PM

Harnaj Sandhu : हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यापासून सोशल मीडियावर तिचा बोलबाला आहे. त्यातच, शशी थरुर यांनी तिच्यासोबत सेल्फी घेत एक फोटो शेअर केला आहे.

ठळक मुद्देहरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यापासून सोशल मीडियावर तिचा बोलबाला आहे. त्यातच, शशी थरुर यांनी तिच्यासोबत सेल्फी घेत एक फोटो शेअर केला आहे.

नवी दिल्ली - पंजाबची कन्या हरनाज संधू (Harnaaz Sandhu)ने मिस युनिव्हर्स (Miss Universe)चा खिताब जिंकून देशाचे नाव उंचावले आहे. 13 डिसेंबर 2021 हा ऐतिहासिक दिवस ठरला जेव्हा 21 वर्षांनी मिस युनिव्हर्सचा खिताब पुन्हा एकदा भारतात परत आला. हरनाज सिंधूच्या आधी सुष्मिता सेन (1994) आणि लारा दत्ता (2000) यांनी हा खिताब जिंकला होता. त्यामुळे, हरनाजचे देशभरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. हरनाजने मिस युनिव्हर्स खिताब जिंकल्यानंतर आता माजी केंद्रीयमंत्री खासदार शशी थरुर यांच्यासमवेतच तिचा फोटो व्हायरल झाला आहे. 

हरनाज संधूने मिस युनिव्हर्सचा खिताब जिंकल्यापासून सोशल मीडियावर तिचा बोलबाला आहे. त्यातच, शशी थरुर यांनी तिच्यासोबत सेल्फी घेत एक फोटो शेअर केला आहे. थरुर यांनी ट्विटरवरुन हरनाजचं अभिनंदनही केलंय. थरुर आणि हरनाज यांचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. नेटीझन्सने या फोटोवरुन थरुर यांना ट्रोल केलंय, तर काहींनी हटके सल्लाही दिला आहे. 

थरुर यांनी हरनजाचे मायदेशी स्वागत असल्याचं म्हटलं. तसेच, हरनाजचे स्वागत करताना देशाला अभिमान वाटतो. ती मिस युनिव्हर्सच्या मंचावर जेवढी आकर्षक दिसत होती, तितकीच आकर्षक प्रत्यक्ष भेटल्यावरही दिसून आली, असे थरुर यांनी ट्विट करुन म्हटले आहे. त्यानंतर, अनेकांनी थरुर यांना ट्रोल केलंय. मैथमैटिसिअन नीना गुप्ता यांनी रामानुजन अवॉर्ड जिंकला आहे, त्यांना आपण शुभेच्छा दिल्या का?, असा सवाल एका युजरने केला. तर, तरुण जोशी या युजरसने थरुर यांना आपण राजकारणातील रणबीर कपूर असल्याचे म्हटलंय. 

हरनाज कोण आहे?

हरनाज ही चंदिगडची रहिवासी आहे. तिचा जन्म शीख कुटुंबात झाला. हरनाजला फिटनेस आणि योगाची आवड आहे. हरनाजने अनेक सौंदर्य स्पर्धा जिंकल्या आहेत. 2017 मध्ये तिने मिस चंदीगडचा किताब जिंकला होता. मिस युनिव्हर्सचा किताब जिंकण्यापूर्वीच ती चित्रपटांकडे वळली होती. ती 'बाई जी कुटंगे' आणि 'यारा दियां पू बरन' या दोन पंजाबी सिनेमांमध्ये दिसणार आहे. हे दोन्ही चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहेत

लारा दत्तानेही दिल्या शुभेच्छा

लाराने लिहिले- माझी प्रिय हरनाज, तू केवळ या विजयाच्याच नाही तर आणखी बऱ्याच गोष्टींच्या लायक आहे. तुझा स्वतःवर अतूट विश्वास आहे. यासाठीच तुझा जन्म झाला हे तुम्हाला माहीत आहे. ज्या वर्षी तुझा जन्म झाला त्या वर्षी मी मिस युनिव्हर्स बनले. आम्ही तुझी खूप वाट पाहिली की तू येशील आणि भारतासाठी पुन्हा एकदा मुकुट घेऊन येशील. कदाचित हे नशीबात होते. लारा दत्ताने तिच्या पोस्टमध्ये हरनाज संधूला उज्ज्वल भविष्यासाठी आणि यशासाठी शुभेच्छा दिल्या. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरHarnaaz Sandhuहरनाज संधूMiss Universeमिस युनिव्हर्सTwitterट्विटर