नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्डप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करीत काँग्रेस पक्षाने आपला २०१०-११ चा ताळेबंद सादर करावा, असे स्पष्ट निर्देश दिल्लीच्या न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य पाच नेते आरोपी आहेत.भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने २०१०-११ चा ताळेबंद सादर करावा, असा आदेश न्यायालयाने ११ मार्च रोजी दिला होता. परंतु ताळेबंद सादर करण्यासाठी पक्षाला आणखी वेळ देण्यात यावा, अशी विनंती काँग्रेसचे वकील बदर मेहमूद यांनी केली. वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर महानगर दंडाधिकारी लवलीन यांनी या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ एप्रिलला करण्याचे निश्चित केले. भाजप नेते सुब्रम्हण्यम स्वामी यांच्या याचिकेवर न्यायालय सुनावणी करीत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
हेरॉल्ड; ताळेबंद देण्याचे काँग्रेसला निर्देश
By admin | Published: March 22, 2016 3:17 AM