2020 मध्ये जेव्हा भारतात लॉकडाऊन लागू करण्यात आला तेव्हा महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, पण त्याचवेळी काही तरुणांनी नवीन मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना यशही मिळाले. अशाच एका तरुणाचे नाव आहे हर्ष राजपूत. 27 वर्षीय हर्ष राजपूत यूट्यूबवर कॉमेडी व्हिडीओ बनवतो. हर्ष राजपूतच्या चॅनलचे तब्बल 33 लाख सबस्क्राइबर्स आहेत.
हर्ष राजपूतचा सर्वात लोकप्रिय व्हिडीओ हा तब्बल 2 कोटींहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, जो 10 मिनिटांचा कॉमेडी व्हिडीओ आहे. हर्ष राजपूतने आज तकला दिलेल्या माहितीनुसार, तो बिहारच्या औरंगाबादमधील जसोया गावचा रहिवासी आहे. युट्यूब एडसेन्समधून एका महिन्यात 8 लाख रुपये कमावल्याचे तो सांगतो. याशिवाय ते ब्रँड प्रमोशनमधून अतिरिक्त कमाई करतो.
जून 2022 ते ऑक्टोबर 2022 पर्यंत, हर्षने एडसेन्समधून दरमहा सरासरी साडे चार लाख रुपये कमावले. हर्षचे वडील बिहार पोलिसात होमगार्ड असून त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांसाठी ड्रायव्हर म्हणून काम केले आहे. हर्ष स्वतःला ट्रेंड एक्टर म्हणतो. हर्षने सांगितले की, त्याने दिल्लीत थिएटर केले आणि पुढे मुंबई गाठली. याच दरम्यान, कोरोना आला आणि त्याला घरी परतावे लागले.
लॉकडाऊनच्या काळातच त्यांनी त्यांचे यूट्यूब चॅनल सुरू केले. त्याच्या व्हिडिओंमध्ये, तो एका रिपोर्टरच्या भूमिकेत आहे आणि नव्या समस्यांवर विनोद करतो. काही दिवसांपूर्वीच हर्षने 50 लाखांची ऑडी A4 कार खरेदी केली आहे. कर्ज फेडलं नाही म्हणून त्याच्या घराचा लिलाव होणार होता. मात्र यूट्यूबच्या कमाईमुळे घराचा लिलाव होण्यापासून थांबला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"