Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 03:15 PM2024-09-20T15:15:45+5:302024-09-20T15:39:31+5:30

भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आहे.

Haryana Assembly Election 2024 Congress candidate Vinesh Phogat has made a big claim | Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

Haryana Assembly Election 2024 : भारताची स्टार महिला कुस्तीपटू विनेश फोगाट हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीत उतरली आहे. काँग्रेसच्या तिकीटावर ती जुलाना या मतदारसंघातून नशीब आजमावत आहे. विनेशने विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतल्याने जुलानाची जागा चर्चेत आहे. भाजप आणि आम आदमी पक्षाने देखील इथे तगडा उमेदवार दिला आहे. विनेश प्रचारात व्यग्र आहे. प्रचारादरम्यान विनेशने एक मोठा दावा करताना खेळाडूंसाठी खेळाडूच पॉलिसी तयार करतील असे तिने सांगितले. आम्हाला संधी मिळाल्यास अधिकारी कोणती पॉलिसी तयार करणार नाहीत. ५ तारखेला सर्वकाही ठीक झाल्यास खेळाडूंना फायदा होईल, असेही तिने नमूद केले.

विनेश फोगाट पुढे म्हणाली की, खेळाडू हे आमचे कुटुंब आहे. खेळाडूंना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो याची मला जाणीव आहे. पैसे भरूनही नोकरी मिळत नाही. मी ऑलिम्पिक पदकेही जिंकली आहेत, मला ऑफर कधीच आल्या नाहीत. जींद जिल्ह्यातील जुलाना मतदारसंघातून काँग्रेसने विनेश फोगाट, भाजपाने कॅप्टन योगेश बैरागी आणि जेजेपीने विद्यमान आमदार अमरजीत सिंह ढांडा यांना उमेदवारी दिली आहे. आम आदमी पक्षाने कविता दलाल यांना तिकीट दिले आहे. जींद जिल्ह्यातील ही जागा भाजपाने कधीही जिंकलेली नाही. २००५ मध्ये काँग्रेसने ही जागा जिंकली होती.

आम आदमी पार्टीने विनेश फोगाटच्या विरोधात WWE महिला रेसलर कविता दलाल यांना उमेदवारी दिली आहे. कविता दलाल यांनी काही दिवसांपूर्वी 'आप'मध्ये प्रवेश केला होता. जींद जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या कविता या उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील बिजवाडा गावच्या सूनबाई आहेत. त्या WWE मधील भारतातील पहिल्या महिला रेसलर आहेत. दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिक २०२४ पासून विनेश फोगाट प्रसिद्धीच्या झोतात आहे. अंतिम फेरी खेळता न आल्याने विनेश ऑलिम्पिक पदकाला मुकली. मग मायदेशात परतताच तिने काँग्रेसचा हात धरला. 

 

Web Title: Haryana Assembly Election 2024 Congress candidate Vinesh Phogat has made a big claim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.