काँग्रेससाठी तुष्टीकरण हेच सर्वात मोठे लक्ष्य आहे. आज तर अशी परिस्तिती निर्माण झाली आहे की, काँग्रेसच्या राज्यात कर्नाटकमध्ये गणतपतीजींनाच तुरुंगात टाकले जात आहे. गणपतीजींना पोलिसांच्या पिंजऱ्यात बंद करण्यात आले. संपूर्ण देश आज गणेशोत्सव साजरा करत आहे आणि काँग्रेस विघ्नहर्त्याच्या पूजेतही विघ्न टकत आहे. तुष्टीकरणासाठी काँग्रेस काहीही करू शकते," अशा शब्दात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. ते हरियाणातील कुरुक्षेत्रात प्रचारसभेला संबोधित करत होते.
आजची काँग्रेस म्हणजे, अर्बन नक्षलवादाचे नवे रूप -मोदी पुढे म्हणाले, "गांधीजी नेहमीच सत्याची बाजू घेत होते. स्वातंत्र्यानंतर काही वर्षे काँग्रेसवर महात्मा गांधींच्या संस्काराचा परिणाम होता. मात्र, आज ही ती जुणी काँग्रेस नाही. आजची काँग्रेस म्हणजे, अर्बन नक्षलवादाचे नवे रूप बनली आहे. आता काँग्रेसला खोटे बोलण्यात कसल्याही प्रकारची लाज वाटत नाही. काँग्रेसचे खोटे पकडले गेले तरी तिला लाज वाटत नाही. काँग्रेस रोजच्या रोज एक नवं खोटं बोलते. काँग्रेस देशाच्या एकात्मतेवर सातत्याने वार करत आहे. काँग्रेसकडून देशावर नक्षलवादी विचार थोपले जात आहेत." एवढेच नाही तर, "भाजपला बदनाम करण्यासाठी, भारताची बदनामी करण्यात त्यांना (काँग्रेस) जराही लाज वाटत नाही. यामुळे आपल्याला काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांपासून सावधान रहायचे आहे," असेही मोदी यावेली म्हणाले.
हरियाणामध्ये भाजपची हैटट्रिक निश्चित -यावेळी सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या सरकारच्या कामांचा पाढा वाचत हरियाणामध्ये पुन्हा एकदा भाजप सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला. हरियाणामध्ये भाजपची हैटट्रिक निश्चित असल्याचेही ते म्हणाले. तसेच, "विकसित भारतासाठी हरियाणा विकसित होणए अत्यंत आवश्यक आहे. हरियाणाच्या पावण भूमिवरून मी आपल्या सर्वांना पुन्हा एकदा भाजप सरकार बनवण्यासाठी निवेदन करतो," असेही मोदी म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले, "आमच्या हरियाणाचे लोक शब्दाचे अत्यंत पक्के आहेत. एकदा वचन दिले... की दिले. भाजपनेही हरियाणाकडून हेच शिकले आहे. मी तर हरियाणाची 'रोटी' खालली आहे. भाजप जे बोलते ते नक्की करून दाखवते." एवढेच नाही तर, "देशातील वृद्धांना दिलेल्या गॅरंटी मोदीने पूर्ण केली आहे. मी हरियाणातील सर्व भाऊ बहिणींना सांगेन की, आपण आपल्या मुलांकडे लक्ष द्या, आपल्या माता-पित्यांची चिंता आपला हा मुलगा, आपला हा भाऊ करत आहे. हरियाणामध्ये भाजप सरकार संपूर्ण सेवाभावाने काम करत आहे," असेही मोदी म्हणाले."