विनेश फोगाट निवडणूक आखाड्यात, हरयाणात विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारीची शक्यता?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2024 09:34 AM2024-09-04T09:34:08+5:302024-09-04T09:36:09+5:30
Haryana Assembly Election 2024: हरयाणातील आंतरराष्ट्रीय पहिलवान विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया आता राजकीय आखाड्यात दिसणार आहेत. हरयाणातील विधानसभा निवडणुकीत या दोन पहिलवानांना तिकीट देण्याचा विचार काँग्रेस करत आहे.
- आदेश रावल
नवी दिल्ली - हरयाणातील आंतरराष्ट्रीय पहिलवान विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया आता राजकीय आखाड्यात दिसणार आहेत. हरयाणातील विधानसभा निवडणुकीत या दोन पहिलवानांना तिकीट देण्याचा विचार काँग्रेस करत आहे.
विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांच्या संभाव्य उमेदवारीसाठी मतदारसंघाबाबत पक्षाने सर्वेक्षणही केले आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना असे वाटते की, बजरंग पुनिया यांनी निवडणूक लढवावी. बजरंग पुनिया हे बादली मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छितात. मात्र, येथे कुलदीप वत्स हे काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. अशा स्थितीत विद्यमान आमदारांना तिकीट नाकारून पुनिया यांच्यासाठी निवडणुकीचे मैदान सज्ज केले जाऊ शकते.
लढणार कुठून?
विनेशही निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. अर्थात, विनेशने अगोदर निवडणूक लढण्यास राहुल यांना नकार दिला होता. पण, आता काँग्रेस विनेश यांना बारडा मतदारसंघातून उमेदवारी देऊ इच्छिते. या मतदारसंघात विनेश यांना तिकीट देणे शक्य आहे. पक्षाचे नेते भूपेंद्र सिंह हुड्डा यांचीही विनेश यांच्या उमेदवारीसाठी सहमती आहे.