शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

हरयाणात 14 जागांवर काँग्रेसचा निसटचा पराभव; आम आदमी पक्षामुळे गमावल्या 5 जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 3:36 PM

Haryana Assembly Election Results 2024: अपक्षांमुळे काँग्रेसला सर्वाधिक फटका बसला. एका जागेवर काँग्रेस उमेदवार अवघ्या 32 मतांनी पडला.

Haryana Assembly Election Results 2024 Latest News: काल(8 ऑक्टोबर 2024) हरयाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपच्या मतांचा टक्का वाढला, तर हरयाणात सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यात यश आले. हरयाणामध्ये भाजपने 48 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला 37 जागा मिळाल्या. गेल्या 10 वर्षांपासून भाजपचा पराभव करण्याच्या विचारात असलेल्या काँग्रेसचे हात यंदाही रिकामेच राहिले. अतिआत्मविश्वासामुळे काँग्रेसचा पराभव झाल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. 

अनेक ठिकाणी निसटता पराभवविशेष म्हणजे, हरयाणातील अशा अनेक जागा आहेत, जिथे काँग्रेसच्या उमेदवाराचा निसटता पराभव झाला. म्हणजेच, अतिशय कमी फरकाने काँग्रेस उमेदावाराला पराभवाचा सामना करावा लागला. तर, राज्यातील 5 जागा अशाही आहेत, जिथे आम आदमी पक्षामुळे काँग्रेसचा उमेदवार पडला. या जागांवर काँग्रेसच्या उमेदवारापेक्षा 'आप'च्या उमेदवाराला जास्त मते मिळाली. अशा प्रकारे पक्षाने एकूण 19 जागा थोडक्यात गमावल्या.

'आप'मुळे काँग्रेसने या जागा गमावल्या

  • निवडणुकीपूर्वी AAP आणि काँग्रेस एकत्र येईल, असे वाटत होते. पण, जागावाटपावरुन न जमल्यामुळे आपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. हाच काँग्रेससाठी टर्निंक पॉइंट ठरला.  आपमुळे ज्या 5 जागा काँग्रेसने गमावल्या, त्यातील पहिली जागा उचाना कलान मतदारसंघाची आहे. या जागेवर भाजपच्या देवेन्द्र चतर भुज अत्री यांनी काँग्रेस उमेदवाराला अवघ्या 32 मतांनी पराभूत केले. तर या जागेवरील आपचे उमेदवार पवन फौजी यांना 46473 मते मिळाली. 
  • दुसरी जागा डबवली विधानसभेची. येथील INLD चे आदित्य देवी लाल यांना एकूण 56074 मते मिळाली आणि त्यांनी काँग्रेसच्या अमित यांचा 610 मतांनी पराभव केला, तर या जागेवर आपचे उमेदवार कुलदीप सिंह यांना 6606 मते मिळाली. दादरी विधानसभा जागेबाबत बोलायचे झाले, तर भाजपचे उमेदवार सुनील सतपाल सांगवान यांनी काँग्रेस उमेदवाराचा एकूण 1957 मतांनी पराभव केला. या जागेवर आप उमेदवार धनराज सिंह यांना एकूण 64229 मते मिळाली.
  • महेंद्रगड जागेवर भाजपचे उमेदवार कंवर सिंह यांना एकूण 63036 मते मिळाली. त्यांनी काँग्रेस उमेदवाराचा 2648 मतांच्या फरकाने पराभव केला. या जागेवर आपचे उमेदवार डॉ.मनिष यादव यांना 61296 मते मिळाली. असंध विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार योगेंद्र सिंह राणा यांना 54761 मते मिळाली. त्यांनी विरोधी काँग्रेसचे उमेदवार समशेर सिंग गोगी यांचा 2306 मतांनी पराभव केला. असंध मतदारसंघातून 'आप'ला एकूण 4290 मते मिळाली.
  • या जागांवर अपक्षांनी दिला झटका
  • हरियाणात 14 जागा अशा आहेत, जिथे तिसऱ्या क्रमांकाच्या उमेदवाराला काँग्रेसपेक्षा जास्त मते मिळाली. महेंद्रगड भाजपचे उमेदवार कंवर सिंह यांना 63036 मते मिळाली. येथे काँग्रेसचा उमेदवार 2648 मतांनी पराभूत झाला, तर स्वतंत्र पक्षाचे संदीप सिंग यांना 20834 मते मिळाली.
  • सामलखा येथील भाजपचे उमेदवार मनमोहन भडाना यांनाही एकूण 81293 मते मिळाली. काँग्रेसचे उमेदवार धरमसिंह छौक्कर 61978 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. या जागेवर अपक्ष रविंदर मच्छरौली यांना 21132 मते मिळाली. कालका मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार शक्ती राणी शर्मा विजयी झाल्या आहेत. त्यांना एकूण 60612 मते मिळाली. तर काँग्रेसचे उमेदवार प्रदीप चौधरी यांना 49729 मते मिळाली. या जागेवर अपक्ष गोपाळ सुखोमाजरी यांना एकूण 31688 मते मिळाली.
  • बध्रा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार उमेद सिंह यांना एकूण 59315 मते मिळाली. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सोमवीर सिंग यांचा 7585 च्या फरकाने पराभव केला. या जागेवर अपक्ष उमेदवार सोमवीर घसोला यांना एकूण 26730 मते मिळाली. यमुनानगर जागेवरून भाजपचे उमेदवार घनश्याम दास यांना एकूण 73185 मते मिळाली आणि त्यांनी काँग्रेसचे उमेदवार रमन त्यागी यांचा 22437 च्या फरकाने पराभव केला. या जागेवर अपक्ष उमेदवार कपिल यांना एकूण 278 मते मिळाली.
  • असंध मतदारसंघातून भाजपचे उमेदवार योगेंद्र सिंह राणा यांना एकूण 54761 मते मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या समशेर सिंग गोगी यांचा 2306 मतांनी पराभव केला. येथे अपक्ष उमेदवार जिले राम शर्मा यांना एकूण 16302 मते मिळाली. सफिदोन मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राम कुमार गौतम यांना 58983 मते मिळाली. राम कुमार यांनी काँग्रेसचे सुभाष गंगोली यांचा 4037 मतांनी पराभव केला. येथे अपक्ष उमेदवार जसबीर देसवाल यांना 20114 मते मिळाली.
  • नरवाना मतदारसंघातून भाजपचे उमेदवार कृष्ण कुमार यांना 59474 मते मिळाली. कृष्ण कुमार यांनी काँग्रेसचे उमेदवार सतबीर डबलेन यांचा 47975 मतांनी पराभव केला. दादरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुनील सतपाल सांगवान यांना एकूण 65568 मते मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या मनीषा सांगवान यांचा 1957 मतांनी पराभव केला. या जागेवर अपक्ष अजित सिंह यांना 3369 मते मिळाली.
  • राय मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कृष्णा गहलावत यांना एकूण 64161 मते मिळाली. कृष्णा गेहलावत यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी जय भगवान अंतिल यांचा 4673 मतांनी पराभव केला. या जागेवर अपक्ष प्रतीक राजकुमार शर्मा यांना 12262 मते मिळाली. तोशाम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार श्रुती चौधरी यांना एकूण 76414 मते मिळाली. त्यांनी प्रतिस्पर्धी अनिरुद्ध चौधरी यांचा 14257 मतांनी पराभव केला. या जागेवर अपक्ष शशी रंजन परमार यांना एकूण 15859 मते मिळाली. सोहना मतदारसंघातून भाजपच्या तेजपाल तन्वर यांना 61246 मते मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या रोहतास सिंह यांचा 11877  मतांनी पराभव केला. या जागेवर अपक्ष उमेदवार जावेद अहमद यांना एकूण 49210 मते मिळाली.
टॅग्स :haryana assembly election 2024हरियाणा विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसAAPआपBJPभाजपा