Haryana Assembly Election Result 2024 : हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने मोठं यश मिळवले. काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. या निकालातील आता आकडेवारी समोर आली आहे. निवडणुकीच्या काही दिवस आधीच राम रहिम तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला. यावेळी काँग्रेसने भाजपावर निशाणा साधला होता. पण, राम रहीम याच्या भागातील जास्त फायदा भाजपलाच नाहीतर काँग्रेसलाही झाल्याचे समोर आले आहे.
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
डेरा समर्थकांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या २८ विधानसभा मतदारसंघांपैकी प्रमुख पक्षांना १५, भाजपने १०, INLD दोन आणि एका अपक्ष उमेदवाराने विजय मिळवला. या मतदारसंघात काँग्रेसला ५३.५७ टक्के, भाजपला ३५.७१ टक्के, आयएनएलडीला सात टक्के आणि अपक्षांना ३.५७ टक्के मते मिळाली आहेत. हरयाणा काँग्रेसचे बहुतेक नेते पॅरोलबाबत फारसे बोलले नाहीत याचे हे एक मोठे कारण असू शकते, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
या जागांवर काँग्रेस जिंकले
हरयाणातील फतेहाबाद, कैथल, कुरुक्षेत्र, सिरसा, कर्नाल आणि हिसार या सहा जिल्ह्यांतील २८ विधानसभा जागांवर काँग्रेसला भाजपपेक्षा जास्त फायदा झाला. फतेहाबाद, रतिया, तोहाना , कलात, कैथल, शहााबाद, ठाणेसर, पेहोवा, कलमवाली, सिरसा, एलेनाबाद, आदमपूर, उकलाना आणि नारनौंदमध्ये काँग्रेसने विजय मिळवला.
या जागांवर भाजपाला यश
हांसी, बरवाला, हिस्सार, नलवा, असंध, घरौंडा, कर्नाल, उंद्री, निलोखेरी, लाडवा आणि पुंद्री येथे भाजपाने बाजी मारली. डबवली आणि रानियामध्ये INLD विजयी झाले, तर सावित्री जिंदाल हिसारमध्ये विजयी झाल्या आहेत.
राम रहिम याने ३ ऑक्टोबर रोजी सिरसा येथील डेरा अधिकाऱ्यांना भाजपला मतदान करण्याचे निर्देश दिल्याचे बोलले जात आहे. निवडणूक आयोगाने त्याच्यावर ऑनलाइन प्रचार करण्यास किंवा सत्संग आयोजित करण्यास बंदी घातली होती.
शाह सतनाम पुरा येथील दोन मतदान केंद्रांच्या निकालावरुन राम रहिम याची भाजपाला मदत झाल्याचे समोर आले.राम रहिम याच्या अनुयायांची संख्या १.२५ कोटी आहे. डेराच्या ३८ शाखांपैकी २१ शाखा हरियाणामध्ये आहेत.