Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 03:46 PM2024-10-08T15:46:29+5:302024-10-08T15:50:32+5:30

Haryana Assembly Election Results 2024: महत्वाचे म्हणजे, काँग्रेसला मोठा विजय मिळेल, असा दावा सर्वच एक्झिट पोलमध्ये करण्यात आला होता. तो फोल ठरला आहे.

haryana assembly election result 2024 Why Congress could not stop BJP's winning chariot in Haryana Here are 5 important reasons | Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं

Haryana Assembly Election Results 2024 हरियाणात भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही काँग्रेस? ही आहेत 5 महत्वाची कारणं

हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करताना दिसत आहे. तर काँग्रेसचा 2014 पासून सलग तिसऱ्यंदा पराभव झाला आहे. आतापर्यंत आलेल्या निकालात भाजप 49 जागांवर आघाडीवर दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, काँग्रेसला मोठा विजय मिळेल, असा दावा सर्वच एक्झिट पोलमध्ये करण्यात आला होता. तो फोल ठरला आहे.

आज अर्थात मंगळवारी हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल यायला सुरूवात झाली, तेव्हा काँग्रेस आघाडीवर दिसत होती. काही क्षणांसाठी तर हरियाणात काँग्रेस भाजपचा विजय रथ रोखेल आणि सत्तेत येईल, असेही वाटू लागले होते. मात्र जस-जशी मत मोजनी पुढे सरकत गेली, तस-तशी काँग्रेस मागे पडत गेली आणि भाजपने बहुमताचा आकडा गाठला. यानंतर आता, हरियाणात काँग्रेसचा पराभव का झाला? काँग्रेस भाजपचा विजयी रथ का रोखू शकली नाही? यासंदर्भात चर्चा सुरू झाली आहे.

ही आहेत काँग्रेसच्या पराभवाची 5 महत्वाची कारणं -

काँग्रेसमधील गटबाजी -
पक्षातील गटबाजी, हे काँग्रेसच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण मानले जात आहे. कुमारी शैलजा यांची नाराजीही आता समोर आली आहे. अशोक तंवर यांचे परत येणेही काँग्रेसचे डॅमेज कंट्रोल करू शकले नाही

अँटी इंकंबन्सीच्या भरवशावर - 
काँग्रेस पक्ष अनेक जागांवर 10 वर्षांतील अँटी इंकंबन्सीच्या भरवशावर दिसला. याशिवाय, जून 2024 च्या लोकसभा निवडणुकीत पाच जागांवर विजय मिळवणारी काँग्रेस अति आत्मविश्वासात दिसली. 

संविधान आणि आरक्षणाचा मुद्दा भाजपची रणनीती भेदू शकला नाही -
लोकसभा निवडणुकीत संविधान आणि आरक्षणाचा मुद्द्यावरून बाजप विरोधात तुतारी वाजवणाऱ्या काँग्रेसने हा डाव हरियाणातही खेळला. मात्र त्यांना तेथे भाजपच्या रणनीतीला भेदता आले नाही.

अनेक नेते आपल्याच जागांपुरते मर्यादित राहिले -
काँग्रेसचे अनेक नेते आपल्याच जागांपुरते मर्यादित राहिले. याशिवाय, निवडणुकीदरम्यान इतर पक्षांतून आलेल्या लोकांना पक्षात घेणेही काही जागांवर अंगलट आले.

भाजपच्या लाभार्थी वर्गाला पर्याच शोधता आला नाही -
हरियाणा काँग्रेसला, भाजपच्या लाभार्थी वर्गाला पर्याच शोधता आला नाही. याशिवाय, कुस्तीपटू आणि शेतकऱ्यांचा मुद्दाही फारसा फायद्याचा ठरला नाही.

Web Title: haryana assembly election result 2024 Why Congress could not stop BJP's winning chariot in Haryana Here are 5 important reasons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.