निकालात अनिल विज पिछाडीवर! रिपोर्टरनं केली फरमाइश, गायलं- "हर फिक्र को धुएं में उडाता चला गया'; बघा VIDEO
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 01:10 PM2024-10-08T13:10:09+5:302024-10-08T13:11:13+5:30
Haryana Assembly Election Results 2024 : निवडणूक आयोगाच्या वेबसाइट नुसार दुपारी 1 वाजेपर्यंत आलेल्या निकालात अनिल विज यांना 19898 मते मिळाली आहेत. ते 545 मतांनी पीछाडीवर दिसत होते. तर येथून काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार चित्रा सरवारा या 20443 मतांसह आघाडीवर दिसत आहेत.
हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाय येत आहे. आकड्यांचा खेळ सुरू आहे. सुरुवातीला काँग्रेस आघाडीवर दिसत होती. मात्र नंतर, चित्र पालटलं आणि भाजपने बहुमताचा आकडा पार केला. यानंतर नेतेमंडळींच्या प्रतिक्रियाही समोर येणे सुरू झाले आहे. यात हरियाणातील अंबाला कँट जागेवरील भाजपचे उमेदवार तथा राज्याचे माजी गृहमंत्री अनिल विज पिछाडीवर असूनही आनंदात आणि अपल्या खास अंदाजात गाणे गाताना दिसले.
निवडणूक आयोगाच्या वेबसाइट नुसार दुपारी 1 वाजेपर्यंत आलेल्या निकालात अनिल विज यांना 19898 मते मिळाली आहेत. ते 545 मतांनी पीछाडीवर दिसत होते. तर येथून काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार चित्रा सरवारा या 20443 मतांसह आघाडीवर दिसत आहेत.
निकालादरम्यान एएनआयच्या पत्रकाराने अनिल वीज यांच्याकडे गाणे गाण्याची फरमाइश केली, यावर वीज यांनी मोहम्मद रफी यांचे गीत 'मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उडाता चला गया' गावून ऐकवले. हातात चहाचा कप घेत ते म्हणाले, "मी हरियाणातील सर्वाधिक ऑर्गेनाइज निवडणूक लढली आहे."
बघा व्हिडिओ -
#WATCH | #HaryanaElections | BJP candidate from Ambala Cantt, Anil Vij sings," Mein zindagi ka saath nibhata chala gaya, har fikr ko dhuyen mein udata chala gaya...."
— ANI (@ANI) October 8, 2024
Vij trailing by a margin of 1199 votes after 2/16 rounds of counting here, as per the latest EC data. pic.twitter.com/Gjyr5Be0PQ
काँग्रेसचा निवडणूक आयोगावर आरोप -
हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगावर आकडे संथ गतीने अपडेट केल्याचा आरोप केला आहे. "निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर निवडणुकीचे कल जाणीवपूर्वक संथ गतीने अपडेट केले जात आहे. यामुळे भाजप प्रशासनावर दबाव टाकण्याचा प्रयत्न तर करत नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे", असे जयराम रमेश यांनी म्हटले आहे.