हरयाणात काँग्रेसला अजुनही होप्स...? 'या' जागा ठरवणार कोणाचे सरकार, मताधिक्य केव्हाही....

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2024 02:08 PM2024-10-08T14:08:34+5:302024-10-08T14:11:40+5:30

Haryana Assembly Election Results 2024 : हरयाणा विधानसभेचे निकाल समोर आले आहे. आधी काँग्रेस आघाडीवर होती, पण काही तासात भाजपाने आघाडी घेतली.

Haryana Assembly Election Results 2024 In 13 seats, Congress is trailing by less votes | हरयाणात काँग्रेसला अजुनही होप्स...? 'या' जागा ठरवणार कोणाचे सरकार, मताधिक्य केव्हाही....

हरयाणात काँग्रेसला अजुनही होप्स...? 'या' जागा ठरवणार कोणाचे सरकार, मताधिक्य केव्हाही....

Haryana Assembly Election Results 2024 : हरयाणा विधानसभेचे निकालाचे आकडे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीला काँग्रेसने मोठी आघाडी घेतली होती. पण काही तासातच मोठा उलटफेर झाला आणि भाजपाने पुन्हा एकदा मुसंडी मारली. यामुळे आता हरयाणामध्ये भाजपा तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, आजूनही मतमोजणी सुरूच आहे. काही जागांवर काँग्रेस काही हजार मतांनीच पिछाडीवर आहे. यामुळे अजूनही काँग्रेसला सत्ता स्थापनेची आशा आहे. 

Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: अखेर विनेश फोगाट हरयाणाची दंगल जिंकली; 6050 मतांनी भाजप उमेदवाराचा पराभव

आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपा ४८ जागांवर तर काँग्रेस ३६ जागांवर आघाडीवर आहे. हरयाणामध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी ४६ जागांची आवश्यक्ता आहे. यामुळे आता भाजपा सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. पण आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. १३ जागांवर काँग्रेस ५ हजार मतांनी पिछाडीवर आहे. या जागांवर जर काँग्रेसने आघाडी घेतली तर काँग्रेस हरयाणामध्ये सरकार स्थापन करु शकते. 

या १३ जागा निर्णायक ठरणार

पंचकुला जागेवर काँग्रेस 2532 मतांनी मागे

रादौर जागेवर काँग्रेस 4075 मतांनी मागे 

इंद्री जागेवर काँग्रेस 2324 मतांनी मागे

असंध मतदारसंघात काँग्रेस 3178 मतांनी पिछाडीवर 

राई मतदारसंघात काँग्रेस 1215 मतांनी पिछाडीवर 

नरवाना जागेवर काँग्रेस 2529

फतेहबादमध्ये 1318

आदमपूरमध्ये 4185

बदरामध्ये- 3592

दादरी मतदारसंघातून -4642

भवानी खेडा मध्ये- 3587

कलनौर- 1178

होडल- 489

 निकालावरुन आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. आता निवडणूक आयोगावर काँग्रेसने आरोप केले आहेत. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर प्रश्न उपस्थित केले आहेत.

जयराम रमेश म्हणाले, लोकसभा निकालांप्रमाणेच हरयाणातील निवडणुकीचे ट्रेंडही मुद्दाम निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर हळू शेअर केले जात आहेत. भाजप प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे का?, असा प्रश्न त्यांनी केला.

Web Title: Haryana Assembly Election Results 2024 In 13 seats, Congress is trailing by less votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.