हरियाणातील विधानसभा निवडणुकीत भाजपने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे. येथे मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर, विविध संस्थांनी एक्झिटपोल जारी केले होते. त्या एक्झिटपोलमध्ये हरियाणात काँग्रेसला संधी मिळेल, तर भाजपची धूळ-धाण उडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्ष निकालात या संस्थांनी हरिणाच्या बाबतीत दिलेला एक्झिट पोल पूर्णपणे फोल ठरला आहे. हरिणायात भाजपचे विजयाची हॅट्रीन नोंदवत गुलाल उधळला आहे. हा विजय भाजपसाठी अत्यंत महत्वाचा आहे. कारण, हरियाणामध्ये आतापर्यंत कुठल्याही पक्षाला सलग तिसऱ्यांदा विजय मिळवता आलेला नाही.
यातच आता केंद्रीय मंत्री तथा बिहारमधील बेगूसरायचे खासदार गिरिराज सिंह यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. गिरिराज सिंह यांनी मंगळवारी (10 ऑक्टोबर, 2024) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमाने थेट लोकसभा विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांच्यावरच निशाणा साधला आहे. "आपण फॅक्ट्रीवाली जिलेबी राहुलजींसाठी आणली आहे. माननीय खर्गेजी यांनी राहुलजींचा पत्ता सांगावा. ती जिलेबी कुठे पाठवू?" अशी पोस्ट त्यांनी केली आहे.
राहुल गांधींनी गोहानातमध्ये खाल्ली होती जिलेबी -हरियाणाच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या विजय संकल्प यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी गोहाना येथील मातुरामची जिलेबी खाल्ली होती. या जिलेबीची टेस्ट त्यांना प्रचंड आवडली होती. ही जिलेबी देश-विदेशात गेल्यास या दुकानाचे रुपांतर एखाद्या फॅक्ट्रीत होईल आणि हजारो लोकांना रोजगारही मिळेल, असे राहुल गांधी यांनी म्हटले होते. यावरूनच राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही निशाणा साधला होता.