हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला आहे. याव र आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'या निकालाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. संपूर्ण राज्य काँग्रेस जिंकणार असे म्हणत होते आणि मग हे निकाल कसे आले. याबाबत कार्यकर्त्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे',असंही गेहलोत यांनी म्हणाले.
"रतन टाटांसारख्या व्यक्तीला खरं तर हयात असतानाच 'भारतरत्न'ने सन्मानित करायला हवं होतं"
आज दिल्लीत काँग्रेसची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीदरम्यान, काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
अशोक गेहलोत म्हणाले, हा पराभव अतिशय गांभीर्याने घेतला जात आहे. संपूर्ण प्रसारमाध्यमे, एक्झिट पोल आणि सर्वसामान्य जनता काँग्रेसचे सरकार स्थापन करणार असल्याचे सर्वेक्षण करत होते. त्यानंतर असे कोणते कारण होते की निकाल उलटे लागले?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. खरगे साहेब आणि राहुल जी यांनी हे गांभीर्याने घेतले आहे. वरिष्ठ पर्यवेक्षक आणि सचिव यांना बोलावून मोकळेपणाने चर्चा झाली, असंही ते म्हणाले.
अशोक गेहलोत म्हणाले, बैठकीत चांगली चर्चा झाली. तळाशी जाणे आवश्यक आहे. ज्या राष्ट्रीय पक्षाच्या विजयाची चर्चा संपूर्ण देश आणि राज्यातून होत होती. निकाल उलटे येण्याचे कारण काय होते? आमच्या कार्यकर्त्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे, असंही गेहलोत म्हणाले.
अशोक गेहलोत म्हणाले, “सामान्य लोकांच्या मनातही भीती आहे. ईव्हीएम हे कारण असू शकते किंवा परिस्थिती काहीही असू शकते. आम्ही निवडणूक आयोगाची भेट घेतली आणि त्यांना आमची शंका दूर करण्यास सांगितले.