Haryana : हरियाणातील भिवानी जिल्ह्यात नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोठी घटना घडली आहे. भिवानी जिल्ह्यात डोंगर खचल्यामुळे (Moumtain Cracking) ८ ते १० वाहना त्याखाली दबली गेली आहे. यात जवळपास १५ ते २० लोक असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर आतापर्यंत तीन जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. तर एका व्यक्तीच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आलीये.
समोर आलेल्या माहितीनुसार डाडम खाण क्षेत्रातील डोंगराचा मोठा भाग खचल्यानं ही घटनाघडली. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं त्वरित मदतकार्याला सुरूवात केली आहे. तसंच घटनास्थळी माध्यमांना आणि सामान्य जनतेलाही जाण्यास मज्जाव करण्यात आलाय. याशिवाय कृषी मंत्री जेपी दलाल आणि एसपी अजित सिंह शेखावत यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. "या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या याची संख्या सांगता येणार नाही. डॉक्टरांची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. आम्ही शक्य तितक्या जणांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न करत आहोत," असे जेपी दलाल म्हणाले.