शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

400 पारचा नारा खोटा होता, माझे स्वतःचे कार्यकर्ते नसते तर हारलो असतो! भाजप खासदाराचा घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 06, 2024 4:28 PM

भाजप नेते राव इंद्रजित सिंह यांनी आपल्याच पक्षाच्या 400-पार घोषणेवर हल्ला चढवला आहे...

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये एनडीएला अपेक्षित यश मिळाले नाही. या निवडणुकीत भाजपने एनडीएसाठी ४०० पारचा नारा दिला होता. मात्र प्रत्यक्षात एनडीएला केवळ २९२ जागा मिळाल्या. अर्थात एनडीएला बहुमत (272) मिळाले आहे. एकट्या भाजपचा विचार करता, या निवडणुकीत भाजपला २४० जागा मिळाल्या असून तो बहुमतापासून (२७२) दूर राहिला आहे. यानंतर आता भाजप नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री राव इंद्रजित सिंह यांनी आपल्याच पक्षाच्या 400-पार घोषणेवर हल्ला चढवला आहे. 400 पारचा नारा खोटा होता, असे त्यांनी म्हटले आहे. 

राव इंद्रजित सिंह म्हणाले, टीव्हीवाले मला विचारत होते की 400 पार होईल का, तर मी कसे बोलणार? यावेळी त्यांनी भाजपच्या हरियाणा युनिटवरही प्रश्न उपस्थित केले आणि सर्व काही ठीक नसल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर, ग्रामीण भागात माझे कार्यकर्ते नसते तर कदाचित मी ही निवडणूक हरलो असतो, असेही राव इंद्रजित यांनी म्हटले आहे.

राव इंद्रजीत यांनी गुडगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस नेते राज बब्बर यांचा पराभव करत 80 हजारहून अधिक मतांनी विजय मिळवला आहे, मात्र, त्यांच्या विजयाचे अंतर गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत बरेच कमी झाले आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी 3 लाखांहून अधिक मते मिळवली होती. तर २०१४ मध्ये तिरंगी लढत होऊनही त्यांना मोठ्या प्रमाणावर मते मिळाली होती.

जुण्या विरोधकांचा सामना -  राव 2014 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. यानंतर त्यांचे काही जुने विरोधकही भाजपमध्ये आले आहेत. ही संख्या सुमारे सहा ते आठ एवढी आहे. यांपैकी काही खासदार तर काही आमदारपदाचे दावेदार आहेत. या नेत्यांनी पक्षासाठी व्यासपीठावर येऊन एकजूट दाखवली नाही. भाजपचे प्रमुख नेते ही जागा सर्वात सुरक्षित मानत होते, मात्र राज बब्बर यांच्या विरोधात ही जागा जिंकण्यासाठी राव यांना बरीच मेहनत करावी लागली.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाHaryanaहरयाणाElectionनिवडणूक 2024