शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
2
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
3
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
4
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
5
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
6
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
8
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
9
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
10
अग्निवीरांसाठी खूशखबर; आता 'ब्रह्मोस'ही देणार नोकरीची संधी, मिळणार एवढे आरक्षण
11
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
12
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
13
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
14
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
15
37 पर्यटकांनी भरलेली बस पुरात अडकली, बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका, बघा थरारक VIDEO
16
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
17
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला
18
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
19
Dharmveer 2 Review : 'नाथा'घरच्या 'आनंदा'ची गोष्ट! प्रसाद ओकचा 'धर्मवीर २' कसा आहे? वाचा रिव्ह्यू
20
Exclusive: रात जवां है! प्रिया बापटची नवी हिंदी सीरिज; पहिल्यांदाच साकारणार 'ही' भूमिका

काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 5:34 PM

Haryana Assembly Elections 2024 : निवडणुकीदरम्यान काँग्रेसने आपल्या १३ बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.

Haryana Assembly Elections 2024 : हरियाणा विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणुकीदरम्यान काँग्रेसने आपल्या १३ बंडखोर नेत्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. हे सर्व नेते पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरोधात निवडणूक लढवत आहेत. ज्या नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे, त्यात जिंदमधील प्रदीप गिल आणि कलायतमधील अनिता धुल्ल यांची नावे प्रमुख आहेत. 

हरियाणामधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष उदयभान यांनी जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, निलंबित करण्यात आलेले सर्व नेते पक्षाच्या विरोधात काम करत आहेत, त्यामुळे या सर्वांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात येत आहे. पत्रात म्हटले आहे की, या नेत्यांची तक्रार आली होती. त्यानुसार ती योग्य असल्याचे दिसून आले. त्यामुळे या सर्वांची पक्षातून हकालपट्टी केली जात आहे. 

अंबाला कँटमधून अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवणाऱ्या चित्रा सरवरा यांना काँग्रेसने अलीकडेच निलंबित केले होते. चित्रा यांच्या निलंबनाचा आदेश काँग्रेस संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी जारी केला होता. दरम्यान, काँग्रेस आधी बंडखोर नेत्यांची समजूत काढत आहे. मात्र, जे बंडखोर आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

कोण-कोणत्या नेत्यांवर कारवाई?हरियाणा काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, गुहियामधून नरेश धांडे, जिंदमधून प्रदीप गिल, पुंडरीमधून सजन्न ढुल आणि सुनीता बॅट्टन, निलोखेरीमधून राजीव गोंडर आणि दयाल सिरोही, पानिपत ग्रामीणमधून विजय जैन, उचाना कलांमधून दिलबाग, दादरीमधून अजित फोगाट, भिवानीमधून अभिजीत सिंह, भवानी-खेरामधून सतबीर रतेला, पृथलामधून नीतू मान आणि कलायतमधून अनिता धुल हे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध लढत आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेसHaryanaहरयाणा